VIDEO : हिरव्यागार जंगलात स्वच्छंदीपणे बागडताय हरणे..! हौशी पर्यटकांची पाऊले जंगलाकडे..

harne.jpg
harne.jpg

नाशिक / येवला : सलामीलाच जोरदार पाऊस झाल्याने राजापूर,ममदापूसह पूर्व भागातील वनहद्दीतील संपूर्ण जंगल हिरवाईने नटलेले आहे. शिवाय छोटेमोठे बंधारे ही पाण्याने तुडुंब भरले असून खळाळणारे पाणी लक्ष वेधून घेते.अशा निसर्गसंपन्न वातावरणात हरणांचे कळप भरतांनाची दुनिया या जंगलात दिसत आहे. लॉकडाऊन असला तरी हे कळप पाहण्यासाठी आता हौशी पर्यटक या जंगलाकडे फिरकू लागले आहे.  

बंधारे पाण्याने भरले..जंगल फुलल्याने हरणे कळपांची भटकंती

राजापूर-ममदापूरचे जंगल या हरणांचे माहेरघर असून आता तर हरणांची संख्या वाढली आहे.वनविभागाने या वन हद्दीत संवर्धनासाठी विविध योजना हाती घेतल्या असून यामुळे जंगल बदलत आहे.उन्हाळ्यातील पाणी व अन्नाची टंचाई हरणांचा छळ करून जीव घेतच आहे. उन्हाळ्यातील दाहकता सहन केलेल्या हरणांना या भागात जोरदार स्वरूपाच्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.जंगलात ठिकठिकाणी बंधारे, खड्डे पाण्याने भरली असून पावसाने मात्र झालेली वृक्षलागवडही हिरवा शालू परिधान करून नटली आहे.जंगलातील डोंगरदऱ्यांत सर्वत्र हिरवळीने वेगळेच सौंदर्य निर्माण करून दिले आहे.त्यामुळे हरणांचे कळप मनसोक्तपणे झाडाझुडपांत स्वतंत्रपणे बागडत आहेत.जोरदार पाऊस पडल्याने जंगल बहरले असून नाले, ओहोळ खळाळून वाहताना व बंधारेही भरल्याने हरणांच्या अन्न- पाण्याची चिंता मिटली आहे.सद्या जंगलाने हिरवा शालू पांघरल्याने हरणांचे बागडणे अधिकच मनसोक्त बनले आहे.

हरणांचा मोर्चा शेताकडेही
या जंगलाचा विस्तार नांदगाव,कोपरगाव ते थेट मराठवाड्याच्या हद्दीपर्यंत असून, तिकडेही हरणांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.दहा हजारांच्या आसपास हरणे असल्याचेही सांगितले जाते. 20 ते 40 हरणांचे हे कळप जंगलात भटकताना जंगलाजवळील नव्हे, तर गावांलगतच्या शेतांकडेही मोर्चा वळवत आहेत.शेतातील उभ्या पिकांची नासाडीही ते करतात. त्यामुळे शेतकरी त्रस्त होतात.
हेही वाचा > ‘आम्ही पोलिस आहोत’ असा विश्वास दाखवला..अन् निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केले असे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com