PHOTO : सीसीटिव्हीमुळे रिक्षात विसरलेली बॅग भेटली खरी...बॅग तपासली तेव्हा सगळ्यांना धक्काच!

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 9 January 2020

चौकात जाण्यासाठी 'त्या' रिक्षात (एमएच 15, एफयू 1562) बसल्या. त्यांच्याकडे एक छोटी बॅग होती. ती बॅग त्यांनी रिक्षाच्या प्रवासी सीटच्या पाठीमागे कप्प्यात ठेवली. शालिमार चौकात उतरल्यानंतर त्यांनी रिक्षाचालक संजय मस्कर (रा. सावतानगर) यांना भाडे दिले. मात्र बॅग रिक्षातच विसरून निघून गेल्या. रिक्षाचालकाच्याही बाब लक्षात आली नाही. त्यानंतर.. 

नाशिक : त्रिमूर्ती चौकातून शालिमारला रिक्षातून गेलेली परजिल्ह्यातील महिला बॅग त्याच रिक्षात विसरल्या. प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर पोलिसांनीही प्रवासाच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचालकही गाठला. त्यानेही जपून ठेवलेली बॅग उघडून पाहिली असता, त्यात जे काही भेटले त्यामुळे सर्वांनाच धक्का लागला.

असा घडला प्रकार

मिनाली मनीष देशमुख (रा. पारोळा, जि. जळगाव) या कामानिमित्त नाशिकमध्ये आल्या होत्या. बुधवारी (ता. 8) दुपारी त्रिमूर्ती चौकातून त्या शालिमार चौकात जाण्यासाठी रिक्षात (एमएच 15, एफयू 1562) बसल्या. त्यांच्याकडे एक छोटी बॅग होती. ती बॅग त्यांनी रिक्षाच्या प्रवासी सीटच्या पाठीमागे कप्प्यात ठेवली. शालिमार चौकात उतरल्यानंतर त्यांनी रिक्षाचालक संजय मस्कर (रा. सावतानगर) यांना भाडे दिले. मात्र बॅग रिक्षातच विसरून निघून गेल्या. रिक्षाचालकाच्याही बाब लक्षात आली नाही. त्यानंतर रिक्षाचालकही प्रवासी भरून पुन्हा सिडकोकडे निघाले असता, बसलेल्या प्रवाशांनी ही बाब लक्षात आणून दिली. रिक्षाचालक मस्कर यांनी रिक्षात प्रवासी असल्याने ती बॅग त्यांच्या घरी ठेवली. मिनाली देशमुख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शालिमार चौकातील वाहतूक पोलिस नीलेश काटकर व अशोक उगले यांना सांगितले. रिक्षाचा क्रमांक वा अन्य काहीही माहिती नसल्याने ज्या ठिकाणाहून रिक्षा प्रवास झाला त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज वाहतूक पोलिसांनी तपासायला प्रारंभ केला. सोबतीला काही रिक्षाचालकही होते. काही सीसीटीव्हीमध्ये रिक्षा निदर्शनास आली. त्यावरील क्रमांकाच्या आधारे रिक्षाचालक मस्कर व त्यांचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यांना फोन केला असता, ते कॅनडा कॉर्नरकडून सिडकोकडे प्रवासी घेऊन येत होते. त्यांना बॅगेविषयी विचारले असता, त्यांनी बॅग घरीच ठेवल्याचे सांगितले. वाहतूक पोलिस आणि मिनाली देशमुख या मस्कर यांच्या घरी गेल्या. बॅग जशी होती तशीच होती. त्यांनी बॅग उघडून एका साडीच्या घडीत ठेवलेले चार तोळे सोन्याचे दागिनेही तसेच होते. रिक्षाचालक मस्कर, वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी, पोलिस नीलेश काटकर, अशोक उगले यांच्या हस्ते दागिने परत करण्यात आले. 

Image may contain: 1 person, standing

हेही वाचा > धरणावर वनभोजन करताना दोन विद्यार्थी गायब...शोध घेतल्यास धक्काच!..

"मी कुरिअर करणार होतो"...रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
रिक्षाचालक मस्कर यांनी, बॅगेच्या एका बाजूला असलेल्या कप्प्यात एक रिसिट होती. त्या रिसिटवरील पत्त्यावर ती बॅग ते कुरिअरने पाठविणार असल्याचे रिक्षाचालक मस्कर यांनी पोलिसांना सांगितले. मस्कर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मिनाली देशमुख व वाहतूक पोलिसांनी त्यांचे कौतुक केले.

हेही वाचा > नदीवरील पडक्या खोलीत तो 'तिच्यावर' बळजबरीने...सत्य समजल्यावर धक्काच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forgotten bag Found in auto rickshaw from CCTV footage Nashik Marathi News