धुळ्याचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत केले यांचे निधन 

प्रशांत कोतकर
Sunday, 18 October 2020

बिलाडी रोड परिसरातील किसान स्टार्च फॅक्टरीजवळील विशालसागर डेअरी परिसरातील शेतात दुपारी एक वाजता अंत्यसंकार होतील.

नाशिक : शहरातील नामांकित दानशूर व्यक्तिमत्त्व, माजी नगराध्यक्ष काकासाहेब चंद्रकांत काशिनाथ केले यांचे रविवारी (ता.१८) रात्री अल्प आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी (ता.१९) सकाळी ११ ला धुळे येथील वाडीभोकर रोडवरील मधुबन कॉलनीतील राहत्या घरापासून निघेल.

बिलाडी रोड परिसरातील किसान स्टार्च फॅक्टरीजवळील विशालसागर डेअरी परिसरातील शेतात दुपारी एक वाजता अंत्यसंकार होतील. पंढरीनाथ केले, भिमाशंकर व गोपाळ केले यांचे बंधू, सुहास वाणी, पराग शेंडे यांचे सासरे तर विशाल केले यांचे ते वडील होत. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Mayor of Dhule Chandrakant Kele passes away nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: