वादाचा वचपा पडला महागात.. अन् 'खाकी' मुळे टळली मोठी घटना ... 

police at night 1.jpg
police at night 1.jpg

नाशिक :  पोलिस नाईक दिलीप नाईक यांच्यासोबत दिंडोरी नाक्‍यावरील निमाणी मंगल कार्यालयाजवळ कर्तव्यावर होते. आहेर यांना चार युवक संशयितरीत्या वावरताना दिसले. त्यांना विचारणा केली असता ते पळून जाऊ लागले.

असा घडला प्रकार...

पंचवटीतील निमाणी मंगल कार्यालयाच्या मोकळ्या जागेत बसलेल्या युवकांना वाहतूक पोलिसांनी हटकले असता पळ काढणाऱ्या चार युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन चॉपर हस्तगत करण्यात आले. वाहतूक शाखा युनिट एकचे पोलिस शिपाई किशोर आहेर यांच्या फिर्यादनुसार, ते शनिवारी (ता.25) पोलिस नाईक दिलीप नाईक यांच्यासोबत दिंडोरी नाक्‍यावरील निमाणी मंगल कार्यालयाजवळ कर्तव्यावर होते. आहेर यांना चार युवक संशयितरीत्या वावरताना दिसले. त्यांना विचारणा केली असता ते पळून जाऊ लागले. पाठलाग करून त्यांना पकडले. या चौघांकडे दोन धारधार चॉपर आढळले. याप्रकरणी संशयित आकाश शिंदे (वय 22), आकाश गायकवाड (19), गिरीश महाले (22), शुभम आहेर (20, सर्व रा. पेठ रोड) यांना अटक केली. पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

...अन्‌ मोठी घटना टळली 
चार संशयितापैकी एकजण भुजबळ नॉलेज सिटीत शिक्षण घेत आहे. त्याचा महाविद्यालयात एकासोबत काहीतरी वाद झाला होता. परंतु त्या वेळी वाद निवळला होता. संशयिताने त्या वादाचा वचपा काढण्याचे ठरविले होते. मिटलेल्या वादास पुन्हा उकरून काढून निमाणी येथे बोलावून प्राणघातक हल्ला करणार होते. वाहतूक पोलिसांना वेळीच या संशयितांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या आणि समयसूचकता दाखवत त्यांनी वेळीच ताब्यात घेतले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com