भयानक! अपघात इतका भीषण की चौघांचे मृतदेह दूरवर फेकले गेले...तीन वर्षाच्या चिमुरड्याचाही दु:खद अंत

accident-mhasrul-696x580.jpg
accident-mhasrul-696x580.jpg

नाशिक / म्हसरूळ : नातेवाईक केशवही दुचाकीवरून त्यांच्यापुढे जात होते. पिक-अपने धडक दिल्याचा मोठा आवाज ऐकून त्यांनी थांबून मागे पाहिले असता, दुचाकीला धडक बसल्याने चौघेही आजूबाजूला फेकले गेल्याचे दिसून आले. यावरून जे काही घडले ते अत्यंत भयानक दृश्य होते...

जे काही घडले ते अत्यंत भयानक दृश्य होते...
तीन शेतमजूर बालकासह मोटारसायकलने (एमएच १४, सीएल २९८८) गिरणारेमार्गे सापगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे जात होते. त्या वेळी गिरणारेहून मखमलाबादकडे भरधाव येणाऱ्या पिक-अपने (एमएच १५, ईजी ९६३३) गोशी नाल्याच्या पुलावर दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात केशव खोडे (वय ३५), त्यांची पत्नी मीरा (३०), तीन वर्षांचा चिमुरडा अनिल (सर्व रा. ओझरखेड) आणि दुचाकी चालविणारा दिलीप नामदेव दिवे (३५, रा. सापगाव) हे चौघे जागीच ठार झाले. दरम्यान, त्यांचे नातेवाईक केशव दिवेही दुचाकीवरून त्यांच्यापुढे सापगावकडे जात होते. पिक-अपने धडक दिल्याचा मोठा आवाज ऐकून त्यांनी थांबून मागे पाहिले असता, दुचाकीला धडक बसल्याने चौघेही आजूबाजूला फेकले गेल्याचे दिसून आले. चौघांच्याही डोक्यास, पायास आणि हातास गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांची हालचालही होत नव्हती. पिक-अपची नंबर प्लेटदेखील या अपघातात निखळून पडल्याचे आढळले. आवाज ऐकून जमलेल्या नागरिकांच्या मदतीने दिवे यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात माहिती कळविली. त्यानंतर पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी पोचले. या प्रकरणी केशव दिवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार म्हसरूळ पोलिस ठाण्यात फरारी पिक-अप चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला. 

पिक-अपचालकाविरोधात गुन्हा दाखल

भरधाव येणाऱ्या पिक-अपने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन वर्षांचे बालक, दांपत्य आणि दुचाकीचालक असे चौघे जागीच ठार झाले. मखमलाबाद- सापगाव रस्त्यावर सोमवारी (ता. १३) दुपारी सव्वातीनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर पिक-अपचालक फरारी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com