ब्रेकिंग : 'त्या' कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील ४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

सोमवारी (ता. 6) पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णाच्या घरातील पाच जणांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या 19 जणांना आरोग्य विभागाने ताब्यात घेतले होते. त्यांच्याही स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. संबंधित रुग्ण रेल्वे ठेकेदार असून, गेल्या 22 मार्चला आग्य्राहून आल्यापासून 4 एप्रिलपर्यंतच्या काळात लेखानगर भाजी मार्केट येथे दिवसाआड जात होता. याशिवाय शहरातील बहुतांश ठिकाणी त्याचा वावर राहिला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासन व आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले आहे. 

नाशिक : भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच नाशिकमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने इथेही धाकधूक वाढली आहे. नाशिकमधील दुसरा कोरोनाबाधित हा गोविंदनगर येथील असून या व्यक्तीच्या कुटुंबियातील पाच पैकी चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर लहान भावाचा रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती मिळत आहे,

पोलिस प्रशासन व आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान

दरम्यान, सोमवारी (ता. 6) पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णाच्या घरातील पाच जणांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या 19 जणांना आरोग्य विभागाने ताब्यात घेतले होते. त्यांच्याही स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. संबंधित रुग्ण रेल्वे ठेकेदार असून, गेल्या 22 मार्चला आग्य्राहून आल्यापासून 4 एप्रिलपर्यंतच्या काळात लेखानगर भाजी मार्केट येथे दिवसाआड जात होता. याशिवाय शहरातील बहुतांश ठिकाणी त्याचा वावर राहिला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासन व आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले आहे. 

VIDEO : नाशिकमध्ये कसा आढळला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह? 

कडेकोट पोलिस बंदोबस्त 
दरम्यान, गोविंदनगर परिसरातील मनोहरनगर हा भाग सील करण्यात आला आहे. त्यासाठी 10 ते 12 ठिकाणी नाकाबंदी केली असून, 30 ते 35 पोलिस कर्मचाऱ्यांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात आहे. याच भागातील संशयित रुग्णांची संख्या पॉझिटिव्हमध्ये गेल्यास हा बंदोबस्त आणखी कडक केला जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.  

हेही वाचा > होम क्वारंटाइन "आमदार' काही ऐकेना! केला "असा' कारनामा अन् पडले वादाच्या भोवऱ्यात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four peoples report negative in families of Corona-positive patient reported negative nashik marathi news