
पेट्रोलपंपावरील कर्मचारी पंपाच्या केबीनमध्ये आराम करीत असतांना दोन मोटरसायकलवर आलेल्या चार अज्ञात संशयितांनी पंपाच्या केबिनची काच फोडत आत प्रवेश केला. यावेळी अचानक झालेल्या आवाजाने कॅबीनमधील कर्मचारी घाबरुन उठले. अन् मग...
नाशिक / वणी : पेट्रोलपंपावरील कर्मचारी पंपाच्या केबीनमध्ये आराम करीत असतांना दोन मोटरसायकलवर आलेल्या चार अज्ञात संशयितांनी पंपाच्या केबिनची काच फोडत आत प्रवेश केला. यावेळी अचानक झालेल्या आवाजाने कॅबीनमधील कर्मचारी घाबरुन उठले. मध्यरात्रीचा हा थरार सीसीटिव्हीत कैद झाला आहे.
मध्यरात्रीचा हा थरार सीसीटिव्हीत कैद
मंगळवार (ता. १४) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास वणी - पिंपळगाव रस्त्यावरील तिसगाव शिवारातील साई गजानन पेट्रोलपंपावरील कर्मचारी पंपाच्या केबीनमध्ये आराम करीत असतांना दोन मोटरसायकलवर आलेल्या चार अज्ञात संशयितांनी पंपाच्या केबिनची काच फोडत आत प्रवेश केला. यावेळी अचानक झालेल्या आवाजाने कॅबीनमधील कर्मचारी घाबरुन उठले. यावेळी संशयीत लुटारुंनी केबिनमध्ये प्रवेश करुन हातातील कोयत्याचा धाक दाखवित पैशाची मागणी केली. यावेळी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी घाबरलेल्या देविदास संपत चतुर,(वय 29) यांच्याकडे पंपाचे असलेले अंदाजे १२ हजार रुपये व स्वत:चे पॉकेट मध्ये असलेले ३ हजार तर भुषण मोरे याने मॅनेजर टेबल ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले दीड हजार असे सोळा हजार पाचशे रुपये घेवून लुटारुंनी घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर कर्मचाऱ्यांनी घडलेली माहिती पेट्रोलपंप मालक अनुपम अशोक भालेराव यांना माहीती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहीती कळविली.
अंधुक प्रकाशात संशयितांची ओळख पटविता आली नाही
यावेळी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिसराची पाहणी केली. दरम्यान सदरची सर्व घटना सीसीटीव्हीत घटना कैद झाली आहे. पोलिसांनी सिसिटिव्ही फुटेजची पाहणी केली असता लूटीचा प्रकार कैद झाला आहे. मात्र रात्रीची वेळ व लाईट बंद असल्याने अंधुक प्रकाशात संशयितांची ओळख पटविता आली नाही. तसेच संशयीतांचे तोंड कपड्याने झाकलेले असल्यामुळे केवळ शरीयष्टी देहबोली व लुटमारीची पद्धत यावरु न तपास सुरु आहे. या पेट्रोलपंपावर जबरी लुट केल्याप्रकरणी २५ ते ३० वयोगट असणाऱ्या संशयीतां विरुध्द पंप कर्मचारी देवीदास संपत चतुर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी घटनास्थळी भेट देत पाहाणी केली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी, पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे अधिक तपास करीत आहे.
हेही वाचा > धक्कादायक! ऑटो गॅरेज, कोल्ड्रींक्स अन् मोबाईलच्या दुकानात चोरीछुपे सुरू प्रकार...शोध घेताच मोठा खुलासा
सुमारे १६ हजार ५०० रुपयांची लुट
वणी - पिंपळगाव रस्त्यावरील तिसगांव फाट्यावरील साई गजानन पेट्रोलपंपावर चार अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवुन सुमारे १६ हजार ५०० रुपयांची लुट केल्याची घटना घडली मंगळवारी रात्री घडली असून सदरचा प्रकार पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
हेही वाचा > आम्हाला पैसे दे.. नाहीतर पुलावरून फेकून देऊ" उड्डाणपुलावरील प्रकार पाहून पोलीसही थक्क