esakal | जगण्यासाठीची धडपड! पिंजर्‍याचे दार उघडताच कोल्ह्याची उसाच्या शेतात धूम; पाहा VIDEO
sakal

बोलून बातमी शोधा

fox.jpg

शर्थीच्या प्रयत्नांनतर तो पिंजर्‍यात बसतो आणि बाहेर काढल्यानंतर जेव्हा त्याला निसर्ग अधिवासात सोडले जाते. तेव्हा काही क्षणात तो उसाच्या शेतात पळून बेपत्ता होतो. मात्र जीव वाचल्याचा आनंद आणि वाचण्यासाठीची कोल्ह्याची धडपड लक्षवेधी ठरली...

जगण्यासाठीची धडपड! पिंजर्‍याचे दार उघडताच कोल्ह्याची उसाच्या शेतात धूम; पाहा VIDEO

sakal_logo
By
संतोष विंचू

नाशिक : (येवला) रात्री कधीतरी विहीरीत पडलेला कोल्हा विहिरीच्या आतील कठड्यावर गोल गोल फिरत विहिरीच्या कडेला उभ्या माणसांकडे पाहत होता. काही वेळात त्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा सोडला जातो...शर्थीच्या प्रयत्नांनतर तो पिंजर्‍यात बसतो आणि बाहेर काढल्यानंतर जेव्हा त्याला निसर्ग अधिवासात सोडले जाते. तेव्हा काही क्षणात तो उसाच्या शेतात पळून बेपत्ता होतो. मात्र जीव वाचल्याचा आनंद आणि वाचण्यासाठीची कोल्ह्याची धडपड लक्षवेधी ठरली...

विहिरीत पडलेला कोल्हयाची वाचण्यासाठीची धडपड

जळगाव नेऊर शिवारात मच्छिंद्र दगडू ठोंबरे यांच्या शेतात बुधवारी (ता. 30) रात्री केव्हातरी एक कोल्हा पडला होता. सकाळी ठोंबरे शेतात गेले तेव्हा हा कोल्हा पाण्याच्या वरती विहिरीत असलेल्या एका कथड्यावर फिरतांना त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांना याबाबत माहिती कळविली. भंडारी वनपाल एम.बी.पवार, वनरक्षक प्रसाद पाटील, गोपाळ हरगावकर, विलास देशमुख, भाऊसाहेब भिसे आदींच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी विहिरीत पिंजरा सोडला मात्र पाण्यापासून काही वर असलेल्या कठड्यावर हा कोल्हा असल्याने पिंजऱ्यात आणि त्याची चुकामुक झाली. शर्थीच्या प्रयत्नानंतर हा बिबट्या पिंजऱ्यात घुसतात तत्काळ पिंजऱ्याचे फाटक बंद करून दोरीने बाहेर काढण्यात आले. 

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

कोल्हयाला मिळाले जीवदान...

उसाच्या शेताच्या आजूबाजूला या पिंजऱ्यातून त्याची नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी सुटका केली. पिंजऱ्याचे फाटक उघडताच काही क्षणार्धात घाबरलेल्या अवस्थेतील हा कोल्हा उसाच्या शेतात जाऊन बेपत्ता झाला...वनविभाग व शेतकरी मात्र एका वन्य जीवाला जीवदान दिल्याच्या दिल्याने आनंदात होते. वन विभागमार्फत १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा होत आहे. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी एका वन्यजीवाला जीवदान दिल्याने वेगळे समाधान असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा