कमी व्याजदराची ऑफर पडली महागात; पावणेतीन लाखांना गंडा 

money fraud.jpg
money fraud.jpg

कर्जाच्या नावे पावणेतीन लाखांना गंडा 
नाशिक : कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून एकाने एका मध्यस्थासह दहा जणांना पावणेतीन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

असा घडला प्रकार

फिर्यादीनुसार, अनिल बजीराणी याने कमी व्याजदरात कर्ज वितरण करणार असल्याचे सांगून गरजू कर्जदार शोधण्यास सांगितले. त्याप्रमाणे पाटील यांनी अनेक कर्ज घेण्यास तयार असणाऱ्यांशी बजीराणी यांची भेट घालून दिली. संशयिताने सर्वांकडून कर्ज प्रकरण प्रोसेसिंग फी, तसेच इतर कारणे देत आठ हजार ते ७० हजारांपर्यंतच्या रकमा घेतल्या. आतापर्यंत साधारण दहा जणांकडून दोन लाख ८३ हजार ७५० रुपयांची रक्कम गोळा केली. परंतु कोणालाही कर्ज दिले नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील व इतर गुंतवणूकदारांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात धाव घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक पी. बी. बाकले तपास करीत आहेत. 

कमी व्याजाने कर्ज देण्याचे आमिष दाखवून गंडा

अनिल बजीराणी (अंधेरी, मुंबई) असे गंडा घालणाऱ्या संशयिताचे नाव आहे. संशयित बजीराणी याने रानू सुनील पाटील (डीजीपी नगर, सिडको) यांना त्याच्या ग्लोबल ट्रस्ट सर्व्हिसेस या फायनान्स कंपनीत नोकरी दिल्याचे भासवले. त्यानंतर कथित कंपनीमार्फत लोकांना कमी व्याजाने कर्ज देण्याचे आमिष दाखवून हा गंडा घातला. याप्रकरणी पाटील यांच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com