esakal | प्रदुषणापासून स्‍वातंत्र्यासाठी युवकांची 'फ्रिडम सायकल राईड'
sakal

बोलून बातमी शोधा

 IMG-20200815-WA0014

नाशिकमध्ये सुद्धा चांगली आणि अभ्यासपूर्ण सायकल योजना आणावी यासाठी येलो स्‍काउट आणि झटका डॉट ऑर्ग या संस्थांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे.

प्रदुषणापासून स्‍वातंत्र्यासाठी युवकांची 'फ्रिडम सायकल राईड'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देशभरात स्‍वातंत्र्य दिनाचा जल्‍लोष केला जात असतांना, देशापुढील प्रदुषण रूपी संकट दुर होऊन प्रदुषणापासून नागरीकांना स्‍वातंत्र्य मिळावे, असा संदेश देण्यासाठी युवकांकडून फ्रिडम सायकल राईड आयोजित केली होती. शहर परीसरातील सायकल राईड करतांना या युवकांनी प्रदुषण मुक्‍तीचा संदेश दिला.

देशभरात आज हजारो सायकलिस्ट रेस्‍ट विथ सायकलींग या मोहिमेचा भाग म्हणून आपल्याला शहरात सायकलिस्टसाठी संसाधनांची मागणी करत आहेत. नाशिकमध्ये सुद्धा चांगली आणि अभ्यासपूर्ण सायकल योजना आणावी यासाठी येलो स्‍काउट आणि झटका डॉट ऑर्ग या संस्थांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे. देशभरात पंचवीस शहरांमधील सायकलिस्ट समुहांकडून आप-आपल्याला शहरासाठीही मागण्या करत आहेत. यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांतील सायकलिस्टनी सहभाग नोंदवला आहे. आतापर्यंत सतरा हजाराहून अधिक नागरीकांनी ऑनलाईन याचिकेवर सह्या केल्या आहेत.

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

याच मोहिमेचा एक भाग म्हणून सायकल राईड घेण्यात आली. यात अरुण भोये, गोपीनाथ मुंढे, मनोज महाले, कृतिका गायकवाड या राष्ट्रीय खेळाडूंनी ११५ किलोमीटर सायकलिंग केली. शेवटच्या टप्प्यात येलो स्‍काउट ग्रुपच्‍या इतर सदस्यांनी त्यांना साथ दिली आणि राजीव गांधी भवनासमोर राईडचा समारोप झाला.

PHOTOS : देश स्वातंत्र्य झाला.. पण आम्ही पारतंत्र्यातच? स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व दिनीच विहिरीत खाटेवर बसून आंदोलन

संपादन - रोहित कणसे

go to top