PHOTO : "तेरे जैसा यार कहा" भाजलेल्या मित्रासाठी मैत्री आली धावून...अन् आनंदाश्रू!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

पळशेत येथील गणेश वार्डे याने थंडीचे दिवस असल्याने सकाळी अंघोळीसाठी चुलीवर पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. गरम पाणी चुलीवरून उतरत असताना तोल जाऊन गरम पाणी त्याच्या अंगावर पडून तो 42 टक्के भाजला. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने शाळेतील मित्रांनी असे काही केले की सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू  उभे राहिले.

नाशिक : असे म्हटले जाते, की संकटकाळी मदतीला धावून येतो तोच खरा मित्र, या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पळसन येथे आठव्या वर्गात शिकणारा मित्र गरम पाणी अंगावर पडून भाजल्याने त्याच्या उपचारासाठी शाळेतील मित्रांनी खाऊचे पैसे जमा करत त्यास मदत केली आहे.

तेरी मेरी यारी...

पळशेत येथील गणेश वार्डे याने थंडीचे दिवस असल्याने सकाळी अंघोळीसाठी चुलीवर पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. गरम पाणी चुलीवरून उतरत असताना तोल जाऊन गरम पाणी त्याच्या अंगावर पडून तो 42 टक्के भाजला. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने शाळेतील मित्रांनी खाऊच्या पैशातून वर्गणी जमा करून पाच हजार रुपयांची तातडीने मदत करीत नाशिक येथे पाठविले. गणेशला सध्या नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. शाळेतील चिमुकल्यांनी मदतीचा हात पुढे केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. मुख्याध्यापक पंढरीनाथ भोये, पदवीधर शिक्षक चिंतामण महाले, संजय गवळी, मोहन धूम, विठ्ठल पाडवी, जिवला गावित, आनंदा जाधव, विठ्ठल चौधरी, सुमित्रा गायकवाड आदींनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे. 

Image may contain: 1 person, standing

क्लिक करा > PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....

मैत्री हीच तर असते ना!

कुठलाही गोष्टीची परवा न करता एकमेकांसाठी काही करून जाणारी, प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी, विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी, मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात, वय, समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी...याचेच एक उदाहरण या चिमुकल्यांनी दाखवले आहे.

क्लिक करा > "माझ्या सासूशी फोनवर बोला अन् बायकोला नांदायला पाठवा"..तिने नकार देताच..   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friends helping to friend motivational Nashik Marathi News