"आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी ३५ कोटी ५३ लाखांचा निधी उपलब्ध"- छगन भुजबळ 

महेंद्र महाजन
Monday, 12 October 2020

आरोग्य विभागास यापूर्वी मूळ तरतुदीनुसार पाच कोटी ६५ लाख आणि पुनर्विनियोजनातून २८ कोटी ३५ लाख असा एकूण ३४ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी शासन निर्देशानुसार २०२०-२१ वर्षासाठी विविध योजनांच्या माध्यमातून ३५ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. 

भुजबळ म्हणाले, की जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत २०२०-२१ साठी पुनर्विनियोजनातून २८ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमातून पाच कोटी १७ लाख, खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमातून एक कोटी आणि जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनांतर्गत सरकारकडून दहा टक्के प्राप्त निधीपैकी २२ लाख ९४ रुपयांचा निधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यान्वित यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

३६ कोटी ११ लाख निधी उपलब्ध

आरोग्य विभागास यापूर्वी मूळ तरतुदीनुसार पाच कोटी ६५ लाख आणि पुनर्विनियोजनातून २८ कोटी ३५ लाख असा एकूण ३४ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापुढील काळातील कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी ३६ कोटी ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या कार्यान्वित यंत्रणांतर्फे जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने संबंधित यंत्रणांकडून निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही  भुजबळ यांनी सांगीतले.

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funds of Rs. 35.53 crore are available for strengthening health facilities nashik news