गणेशभक्तांनो! यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीवर बंदी आहे बरं का...वाचा महापालिकेची नियमावली

ganesh visarjan.jpg
ganesh visarjan.jpg

नाशिक : गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोरोना वाढण्याची अधिक शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने यंदाच्या उत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. यात घरगुती गणेशमूर्ती दोन, तर सार्वजनिक ठिकाणी बसविल्या जाणाऱ्या मूर्ती चार फुटांपेक्षा अधिक असू नये. शिवाय आगमन व विसर्जन मिरवणुका यंदा काढता येणार नाहीत. यासंदर्भात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काही सूचना जारी केल्या आहेत.

आपत्कालीन कायद्यानुसार आचारसंहिता जाहीर

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दहा हजारीपार रुग्णसंख्या पोचली आहे. त्यात ऑगस्टमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता गणेशोत्सवामुळे अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त गमे यांनी आपत्कालीन कायद्यानुसार आचारसंहिता जाहीर केली आहे. त्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अशी आहे गणेशोत्सवाची नियमावली

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक
संसर्ग टाळण्यासाठी धातू किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे
शाडू मूर्तीच्या पूजनाकडे अधिक कल असावा, घरच्या घरी विसर्जन करावे
विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास त्याचा अवलंब करावा
पुढील वर्षी विसर्जन करता आले तर ते करावे
विसर्जनासाठी गर्दी करता येणार नाही
सार्वजनिक मंडळांच्या जाहिराती आकर्षित असू नये. जेणेकरून लोक गर्दी करतील
उत्सवासाठी वर्गणी घेण्यावर बंदी
मंडळांना आरोग्यविषयक शिबिरे घेणे बंधनकारक
कोरोना, मलेरिया, डेंगीबाबत मंडळांकडून जनजागृती आवश्यक
भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी
ऑनलाइन दर्शनाची सोय करावी
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी थर्मल स्क्रिनिंग करावे
सार्वनजनिक मंडप सॅनिटाइज करणे आवश्यक
सोसायट्यांनी कृत्रिम तलावांची निर्मिती करावी

गणेशोत्सवात गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. मंडळांनी महापालिकेला सहकार्य करावे, आरोग्य जनजागृती संदर्भात कार्यक्रम घेऊन कोरोनाची साखळी खंडित करावी. - राधाकृष्ण गमे, महापालिका आयुक्त

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com