बॅगा चोरांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश! पोलिसांकडून धक्कादायक गोष्टींचा खुलासा

crime 111.png
crime 111.png

नाशिक : राज्यातील वेगवेगळ्या शहरांत बॅगा चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्लीतील टोळीस इंदूर येथील सात जणांना बेड्या ठोकल्या असून, या संशयितांकडून इनोव्हा कारसह रोकड असा सुमारे दहा लाख ८६ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

दोन बॅगा हातोहात लांबविल्या.

कांगत्रम सैल्ली दुराई, पवन मोहनलाल, आकाश मोहनलाल, मनतोश अली मुत्तू, मरियप्पा काली बाबू, विनोद राजेंद्र, साहिल सुरेश व त्यांचा अल्पवयीन साथीदार (रा. सर्व दिल्ली) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी रामचंद्र नामदेव जाधव (रा. बोधलेनगर, नाशिक रोड) यांनी तक्रार दाखल केली. जाधव बुधवारी (ता. ५) चारचाकीतून महात्मा गांधी रोड भागात आले होते. त्या वेळी एकाने त्यांना गाडीतून ऑइल गळत असल्याचे सांगितले. मात्र जाधव यांनी त्याकडे कानाडोळा केला. लागलीच दुसऱ्या व्यक्तीनेही गाडीचे ऑइल लिक होत असल्याचे सांगितल्याने जाधव कारखाली उतरले असता चोरट्यांनी गाडीत मागच्या सिटावर ठेवलेल्या दोन बॅगा हातोहात लांबविल्या. त्यातील एका बॅगेत एक लाखाची रोकड होती. ही बाब लक्षात येताच जाधव यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. 

पथकाने तत्काळ कार अडवून संशयितांना बेड्या ठोकल्या

शहर पोलिसांच्या शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथक आणि सरकारवाडा पोलीलिस पथकाने समांतर तपासादरम्यान, दिल्ली येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (ता.१) ही टोळी मध्य प्रदेश येथील इंदूर शहरात रवाना झाल्याचे कळले. त्यानुसार निरीक्षक आनंदा वाघ यांनी सहाय्यक निरीक्षक कुलकर्णी, रघुनाथ शेगर हवालदार येवाजी महाले, विशाल देवरे, शिपाई गणेश वडजे आदींचे पथक इंदूरला जाऊन तेथील हॉटेल आणि लॉजिंग पिंजून काढले. मात्र संशयित हाती लागले नाहीत. परतीच्या प्रवासापूर्वी पोलिसांनी बंजारी, ता. प्रिथमपूर या गावाकडे मोर्चा वळविला असता संशयित पोलिसांच्या हाती लागले. ‘द ग्रीन अ‍ॅपल’ या हॉटेलजवळून पोलिस फेरफटका मारत असताना संशयितांची इनोव्हा (एचआर २६ बीआर ९०४४) पोलिसांच्या नजरेत भरली. पथकाने तत्काळ कार अडवून संशयितांना बेड्या ठोकल्या. 

पोलिसांकडून ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा, सात मोबाईल, मिरची लिक्वीड, गलोर, छर्ररे आणि ७० हजारांची रोकड असा दहा हजार ८६ हजारांचा ऐवज जप्त केला. आतापर्यत सात जणांना अटक केली असून, या संशयितांनी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दिल्लीत असे गुन्हे केले असून, लॉकडाउन अनलॉक होताच पुणे, मुंबई, ठाणे, इंदूर,सु रत आणि अहमदाबादमध्येही असे गुन्हे केल्याची माहिती तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयितांना न्यायालयाने सोमवार (ता.९)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com