बनावट कागदपत्रांद्वारे जमीन बळकावणारी टोळी गजाआड; चौकशीत काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्‍यता 

अरुण मलाणी
Monday, 26 October 2020

बनावट कागदपत्र तयार करून जमीन बळकावणे व विक्री करणाऱ्या नाशिकमधील टोळीला मुंबई नाका पोलिसांनी गजाआड केले. तिघा संशयितांना न्‍यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, चौकशीत काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 

नाशिक : बनावट कागदपत्र तयार करून जमीन बळकावणे व विक्री करणाऱ्या नाशिकमधील टोळीला मुंबई नाका पोलिसांनी गजाआड केले. तिघा संशयितांना न्‍यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, चौकशीत काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 

असा घडला प्रकार
बापू सोनवणे (रा. खर्डा, ता. देवळा), प्रफुल्ल आहेर (वय २६, रा. रासबिहारी रोड, पंचवटी), मंगेश अहिरे (३२, रा. पंचवटी) अशी अटक केलेल्‍या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी प्रकाश चौधरी (६०, रा. मालेगाव) यांनी अमृतधाम परिसरात जागा खरेदी केली होती. निवृत्तीनंतर मालेगावला ते वास्‍तव्‍यास असताना, संशयितांनी त्‍यांच्या नावाची तोतया व्यक्ती उभी केली. त्‍यांच्या नावानेच बनावट पॅन व मतदान कार्ड, बँक खाते उघडले व चौधरी यांचा प्लॉट परस्पर विक्री केला. हा प्रकार निदर्शनास आल्‍यानंतर त्‍यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली. टोळीतील हिरामण गुंबाडे ऊर्फ टक्या फरारी झाला असून, पोलिस त्‍याचा कसून शोध घेत आहेत. या टोळीविरोधात मुंबई नाका, सरकारवाडा, आडगाव व अंबड पोलिस ठाण्यात जागा व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. दरम्‍यान, जागा व्‍यवहारात फसवणूक झालेल्‍यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई नाका पोलिसांनी केले आहे.  

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gang of land grabbers arrested nashik marathi news