esakal | काठेगल्ली हादरली! रात्रभर गॅसचं बटण सुरू आणि सकाळी भडका; कुटुंंबातील चार जण भाजले 
sakal

बोलून बातमी शोधा

kathegalli gas blast.jpg

बनकर चौकातील शिवनेरी अपार्टमेंट लगत असलेल्या एका छोट्याशा घरातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. तसेच घरातून आरडाओरड सुरू झाल्यामुळे आग लागल्याचा संशय नागरिकांना आला. नागरिकांनी पाहताच ते अत्यंत विदारक दृश्य समोर होते.​

काठेगल्ली हादरली! रात्रभर गॅसचं बटण सुरू आणि सकाळी भडका; कुटुंंबातील चार जण भाजले 

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : बनकर चौकातील शिवनेरी अपार्टमेंट लगत असलेल्या एका छोट्याशा घरातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. तसेच घरातून आरडाओरड सुरू झाल्यामुळे आग लागल्याचा संशय नागरिकांना आला. नागरिकांनी पाहताच ते अत्यंत विदारक दृश्य समोर होते.

गॅसगळतीमुळे भडका; नजरचुकीने गॅस चालू राहिला
फ्लॅटमध्ये राहणाऱ्या शेख कुटुंबीयातील महिलेकडून सोमवारी (ता. १२) रात्री नजरचुकीने गॅस चालू राहिला. त्यामुळे गॅस गळती झाली. मंगळवारी (ता. १३) सकाळी चहा ठेवण्यासाठी महिलेने गॅस पेटवला असता गॅसचा भडका उडाला. त्यात कुटुंबीयातील अली अख्तर शेख (वय ४०), आशियाना अलीअख्तर शेख (वय ३५), रमजान अलीअख्तर शेख (वय १८), रुक्साना अलीअख्तर शेख (वय १८) असे चौघे गंभीर भाजले. हजरत अलीअख्तर शेख यांनी चौघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. काठेगल्ली परिसरातील बनकर चौक येथील शिवनेरी अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमध्ये गॅसच्या गळतीने भडका होऊन मंगळवारी (ता.१३) सकाळी चार जण होरपळले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

...नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती

भडक्याच्या आवाजाने इमारतीत एकच गोंधळ उडाला. अग्निशमन विभागाला पाचारण करून अपघातग्रस्त गॅस शेगडी आणि सिलिंडर घराच्या बाहेर काढले. गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असता तर संपूर्ण इमारतीस आग लागून मोठी दुर्घटना घडली असती. उपाचार सुरू असलेल्या अलीअख्तर शेख आणि आशियाना अलीअख्तर शेख दोघांची प्रकृती गंभीर आहे.  

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

संपादन - ज्योती देवरे