VIDEO : पै पै जमा करून उभारला संसार...अन् आज जळून भस्मसात..दुर्दैवी घटना !

राम शिंदे : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

या आगीत सिलिंडरने मोठा पेट घेतल्याने धादवड यांना आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. पेटती आगआटोक्यात न आल्यामुळे धादवड यांनी घराच्या बाहेर पळ काढताच पेटत्या सिलिंडरचा स्फोट झाला.

नाशिक : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथील घोरपडे वस्तीतील मळ्यालगत असलेल्या पोपट चिंधु धादवड या आदिवासी शेतकरी कुटुंबातील तरुणाच्या घरात गुरुवारी (ता.१३)  गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट झालेल्या गॅस सिंलिंडरच्या आगीत धादवड यांच्या घरातील टिव्ही, धान्य, भांडी-कुंडी, आधारकार्ड सह अत्यावश्यक गरजेचे कागदपत्रे, सर्व गरजेच्या वस्तूंसह संपूर्ण घराचे नुकसान झाले आहे.

अशी घडली घटना...

टाकेद येथील माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे यांच्या झाप वस्तीलगत असलेल्या परिसरात गुरुवार (ता.13) सकाळी नऊच्या सुमारास पोपट धादवड हे स्वयंपाक करण्यासाठी घरातील गॅस शेगडी पेटवायला गेले असता पेटवलेल्या शेगडीने ज्वलंत पेट घेतला. या आगीत सिलिंडरने मोठा पेट घेतल्याने धादवड यांना आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. पेटती आगआटोक्यात न आल्यामुळे धादवड यांनी घराच्या बाहेर पळ काढताच पेटत्या सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने धादवड यांचा कुटुंबासह जीव वाचला सदर घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Image may contain: outdoor

कौलारू घराचे संपूर्ण नुकसान

ही माहिती सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे,योगेश घोरपडे, नंदू जाधव यांना कळताच गावातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.व स्थानिक तलाठी प्रशासनाला पंचनामा करण्यासाठी तात्काळ बोलविण्यात आले.सदर स्फोट झालेल्या आगीत धादवड यांच्या कौलारू घराचे संपूर्ण नुकसान झाले असून यात घरातील साठविलेल्या भाताचे, तांदूळ यासह अन्य धान्य, आधार कार्ड सह अत्यावश्यक सर्व कागदपत्रे, पैसे, दूरदर्शनसह इलेक्ट्रॉनिक सर्व वस्तू शेतीतील अवजारे, भांडी कुंडी आदी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

कमी जाडीच्या गॅस सिलिंडरमुळेच स्फोट; शासनाने भरपाई द्यावी - ग्रामस्थ

या घटनेत पोपट धादवड या अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातील तरुणाच्या घराचे जे काही नुकसान झाले आहे त्याला त्याची शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ रतन बांबळे, योगेश घोरपडे,राजेंद्र घोरपडे,अंबादास महाले,नंदू जाधव,किरण मडके,साहेबराव बांबळे आदींसह ग्रामस्थ नागरिकांनी केली आहे. कमी जाडीच्या गॅस सिलिंडरमुळे व गॅस सिलिंडरच्या लिकेजमुळे हा स्फोट झाला असा आक्षेप श्री पोपट धादवड व ग्रामस्थांनी केला आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वी भरून आणलेल्या एच पी कंपनीच्या माझ्या घरगुती अधिकृत गॅस सिलिंडरच्या लिकेजमुळेच हा स्फोट झाला आहे.असे धादवड यांचे म्हणणे आहे

हेही वाचा > नवविवाहितेला मुंबईत विकायचा डाव...नवरा अन् पहिल्या बायकोची काळी कृत्ये!

Image may contain: sky and outdoor

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gas cylinder blast in village farm house Nashik Marathi News