PHOTOS :..अन् "चिमुकलीने" तोंडात रुपयाचे नाणे टाकले..ते गिळले सुध्दा!..धक्कादायक!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

पायल ही शनिवारी (ता.7) सायंकाळी साडेपाचच्या सुमारात राहत्या घराबाहेर खेळत होती, त्यावेळी तिने तोंडात रुपयाचे नाणे टाकले आणि नकळत तिच्याकडून ते गिळले गेले. त्यानंतर....

नाशिक : अवळपाडा (सुरगाणा) येथिल 9 वर्षाच्या चिमुकलीने रुपयाचे नाणे गिळल्याने ते तिच्या श्वसननलिकेच्या वर अडकले. जिल्हा रुग्णालयात शनिवारी (ता.7) मध्यरात्री तिच्यावर शस्रक्रिया करून यशस्वी उपचार करण्यात आले. पायल अशोक वरडे (9, रा अवळपाडा, ता सुरगाणा) असे चिमुकलीचे नाव आहे.

असा घडला धक्कादायक प्रकार...

पायल ही शनिवारी (ता.7) सायंकाळी साडेपाचच्या सुमारात राहत्या घराबाहेर खेळत होती, त्यावेळी तिने तोंडात रुपयाचे नाणे टाकले आणि नकळत तिच्याकडून ते गिळले गेले. त्यानंतर तिला उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला तात्काळ सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु त्याठिकाणी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने खसगी रुग्णालयात नेले. परंतु त्याठिकाणी तिच्यावर उपचार न झाल्याने आणि तिची प्रकृतीही बिघडत असल्याने तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात आणण्याचा निर्णय घेण्यात आला . त्यानुसार मध्यरात्री साडे बारा वाजता तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, कान, नाक, घसा तज्ञ डॉ. संजय गांगुर्डे यांनी तपासण्या करीत तात्काळ शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि भुलतज्ज्ञ डॉ वलावे, डॉ गाडेकर, डॉ शेळके यांनी रात्री दीड वाजता दुर्बिणीतून उपचार करीत तिच्या गळ्यात अडकलेले नाणे काढले. यामुळे वरडे कुटुंबियांनी उपचार करणाऱ्यांचे आभार मानले. 

Image may contain: 3 people, people sitting

डॉक्टरांचे सहकार्य...

तर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश जगदाळे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ निखिल सैंदाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अनंत पवार यांनी डॉ संजय गांगुर्डे, डॉ शेळके, डॉ वलावे, डॉ गाडेकर, ओटी स्टॉप तेजस कुलकर्णी, अतुल पवार यांचे सहकार्य लाभले.

Image may contain: possible text that says 'STANDING'

हेही वाचा > मुलीचा विरह सहन होईना! व्याकूळ मातेचे अखेर टोकाचे पाऊल..

Image may contain: one or more people and people sitting

हेही वाचा > तमाशातच भयंकर तमाशा! दारूची नशा अन् कलांवतांसोबत धक्कादायक प्रकार!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl ate the coin Nashik Marathi News