"माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्या उत्तराची वाट बघेन'..दोन्ही भावांनी युवतीसोबत केले असे..

woman molest by taxi diver.jpg
woman molest by taxi diver.jpg

नाशिक : दोन्ही भावांनी युवतीसोबत धक्कादायक प्रकार केला. ते दोघेही युवतीच्या मागे लागत..तसेच तिला त्रास देत असे. त्या दोघांचाही विरोध जेव्हा त्या युवतीने केला..तेव्हा दोन्ही भावांनी तिच्यासोबत काय केले?

असा घडला प्रकार

बेलतगव्हाण येथे दोन भावांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोनू व मोनू दोंदे (रा. बेलतगव्हाण) अशी संशयितांची नावे आहेत. पीडितेच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. 30) संशयित दोघे पीडितेच्या घराबाहेर शिवीगाळ करीत असल्याने तिने हटकले. त्याचा राग धरून संशयित मोनूने पीडितेचा हात पकडून ओढत लज्जास्पद कृत्य केले. संशयित सोनूने पीडितेच्या मोबाईलवर, असा संदेश पाठविला. नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

विनयभंग केल्यास पडेल महागात

भारतीय दंड विधान ३५४ नुसार विनयभंग म्हणजे काय?आणि त्याला कोणती शिक्षा आहे ?त्याबद्दलची कायद्याची परिभाषा अशी आहे...विनयभंगः महिलेला लज्जा उप्तन्न होईल ह्या हेतुने केलेला अत्याचार व बळाचा बेकायदा वापर.शिक्षा: जो कोणी ,जाणता अथवा अजाणता, महिलेवर अत्याचार करेल अथवा बेकायदेशीरपणे बळाचा वापर करुन असे वर्तन करेल त्याला अश्या कोणत्याही कृत्याबद्दल दोन वर्षांपर्यंत कैद अथवा दंड अथवा दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com