शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या; भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन

राजेंद्र अंकार
Thursday, 22 October 2020

भाजपचे जिल्हा चिटणीस शरद कासार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील वादळी पावसामुळे तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी.

नाशिक : (सिन्नर) तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्याचे मुख्य पिक असलेले कांदा, सोयाबीन व बाजरी बळीराजाच्या हातून गेले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सिन्नर तालुका भाजपतर्फे करण्यात आली. यावेळी तहसीलदार राहूल कोताडे यांना निवेदनही देण्यात आले. 

लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी

भाजपचे जिल्हा चिटणीस शरद कासार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील वादळी पावसामुळे तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष सोनल लहामगे, किसान आघाडीचे उपाध्यक्ष प्रकाश दवंगे, भाऊसाहेब शिंदे, सुभाष करपे, डॉ.दीपककुमार श्रीमाली, दत्तात्रय गोसावी, शरद जाधव, संदीप जाधव, सरला त्रिवेदी, चंद्रकला सोनवणे, सविता कोठुरकर, सुनील माळी, दर्शन भालेराव, सुमन जोशी, सजन सांगळे, संतोष चव्हाण, भास्कर पाटोळे, किरण सांगळे, हितेश वर्मा, अंकुश कापडी, कविता फड, संतोष कमळु आदी उपस्थित होते. 

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give immediate compensation to farmers; BJP statement to tehsildar nashik marathi news