कोरोनाने लावल्या 'अशा' सवयी की मंडळी आजारांपासून कोसो दूर.. अन् दवाखाने मात्र ओस 

corona patients.png
corona patients.png

नाशिक / देवळा : कोरोना संसर्गाला घाबरून प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत असल्याने किरकोळ आजार होऊन आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे पावसाळ्यात फुल असणाऱ्या दवाखान्यांमध्ये तशी शांतता असल्याचे चित्र आहे. 

आजारांपासून मंडळी दूर
कोरोनावर लस वा औषध उपलब्ध नसल्याने प्रतिबंध हाच उपचार मानून प्रत्येकजण स्वतःच्या जिवाला जपत आहे. मग त्यात बाहेरून आल्यावर साबणाने किंवा हॅन्डवॉशने हात धुणे, पायावर पाणी घेणे, बाहेरचे कोणतेही खाद्यपदार्थ न खाणे, नाकातोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, रोज व्यायाम-योगा करणे अशा चांगल्या सवयी जोपासल्या जात आहेत. यामुळे पावसाळ्यात होणारे थंडी-ताप, सर्दी, खोकला, कफ, मलेरिया, फ्लू, हगवण, टायफाइड अशा आजारांपासून ही मंडळी दूर आहे. 

‘कोरोनाने दिले निरोगी जीवन’
कोरोनामुळे विवाह सोहळे थोडक्यात उरकले जात असल्याने प्रवास किंवा गर्दीतील संसर्ग झाला नाही. लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाणसुद्धा कमी झाले आहे. हॉटेल, फास्टफूड बंद असल्याने दूषित पाणी, अन्न याचाही धोका टळला. लॉकडाउनमुळे हवेचे प्रदूषण नियंत्रणात राहिले. यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. कोरोनामुळे अशा आरोग्याच्या चांगल्या सवयी लागल्याने दवाखाने ओस पडले आहेत. ॲडमिट होणाऱ्यांचे प्रमाणही अत्यल्प आहे. कोरोनाच्या संसर्गाची भीती असल्याने दवाखान्यात यायलाही मंडळी घाबरते. त्यामुळे ‘कोरोनाने दिले निरोगी जीवन’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. 


कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक कुटुंब काळजी घेत आहे. तळलेले, उघडे अन्नपदार्थ टाळले जात आहेत. गरम पाणी, शुद्ध घरगुती ताजे अन्न, स्वच्छता, योग्य जीवनपद्धती यामुळे सध्या आजारी पडणाऱ्यांची संख्या निश्चितच कमी झाली आहे. - डॉ. राजेंद्र गुंजाळ, देवळा  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com