PHOTOS : डॉक्टरांनो.. प्रिस्क्रिप्शन राष्ट्रभाषेत लिहिण्याचा प्रयत्न करा - राज्यपाल 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

समाजाच्या गरजू आणि ग्रामीण भागातही चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी काम केले तर अधिक समाधानकारक असेल. सेवाभावी वृत्ती असेल तर देश बळकट होतो. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्‍टरांनी केवळ पैशासाठी काम करू नये राष्ट्र सर्वप्रथम हा विचार महत्वाचा आहे. युवा पिढीने राष्ट्रासाठी समर्पणाची भावना ठेवावी. देशाच्या ग्रामीण भागातील अनेक गावांत आजही डॉक्‍टर नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असेही कोश्‍यारी म्हणाले. 

नाशिक : डॉक्टरांनो.. राष्ट्रभाषेत प्रिस्क्रिप्शन लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण डॉक्‍टरांची प्रिस्क्रिप्शन फक्त मेडिकल दुकानदारांनाच समजते. इतरांना देखील ती कळली पाहिजे. त्यासाठी राष्ट्रभाषेत प्रिस्क्रिप्शन लिहिण्याचा प्रयत्न करा असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी नाशिकमध्ये केले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ झाला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री अमित देशमुख आदी उपस्थित होते.

Image may contain: 2 people, people standing and people on stage

देशाच्या अनेक गावांत आजही डॉक्‍टर नाहीत
समाजाच्या गरजू आणि ग्रामीण भागातही चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी काम केले तर अधिक समाधानकारक असेल. सेवाभावी वृत्ती असेल तर देश बळकट होतो. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्‍टरांनी केवळ पैशासाठी काम करू नये राष्ट्र सर्वप्रथम हा विचार महत्वाचा आहे. युवा पिढीने राष्ट्रासाठी समर्पणाची भावना ठेवावी. देशाच्या ग्रामीण भागातील अनेक गावांत आजही डॉक्‍टर नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असेही कोश्‍यारी म्हणाले. 

Image may contain: 9 people, people smiling, people standing

हेही वाचा > "पप्पा तुम्ही लवकर परत या!" चिमुकल्याची आर्त हाक...काळजाला फोडला पाझर

Image may contain: 4 people, people on stage, people standing, people playing musical instruments and night

आयुर्वेद व वनस्पतींचा भारतात मोठा अभ्यास

रामायणात संजीवनीनं लक्ष्मण पुन्हा शुद्धीत आला ही फक्त कथा नाही. आपल्या दुर्मिळ वनौषधीमध्ये ही ताकद आहे. पुराणात नाडी बघून निदान करायचे. यावरून आयुर्वेद व वनस्पतींचा मोठा अभ्यास भारतात यापूर्वी झाला आहे. त्यात मोठा अर्थ आहे. हे आपल्या देशातील वास्तव असल्याचेही कोश्यारी यांनी शेवटी सांगितले.

हेही वाचा > "आयुक्त माझे मित्र आहेत..तुमच्या मुलाला लगेच नोकरी लावतो"..

Image may contain: 6 people, beard

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor Bhagat Singh Koshyari Tell to write priscription in national language Nashik Marathi News