ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी २ दिवसांमध्ये ११७ अर्ज दाखल 

gram panchayat election 117 applications filed in 2 days in the district nashik marathi news
gram panchayat election 117 applications filed in 2 days in the district nashik marathi news

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारपासून (ता. २३) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी दिंडोरी तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींसाठी आणि कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. आजच्या दुसऱ्या दिवसाअखेर ११७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.

गावोगाव राजकीय फड रंगला  

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राजकीय खलबते थांबण्याचे नाव घेत नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येऊ शकला नाही. आरक्षणनिहाय उमेदवार आणि त्यातही ‘इलेक्टिव्ह मेरीट’ अंतर्गत सामाजिक- राजकीय स्थिती अजमावण्याबरोबर प्रतिस्पर्धी पॅनलमधून कोण उमेदवार असतील याचा अंदाज बांधत सध्यस्थितीत गावोगाव राजकीय फड रंगला आहे. अशातच, आता शुक्रवारी (ता.२५) नाताळ, शनिवार (ता. २६) आणि रविवार (ता. २७) अशी सलग तीन दिवस सुटी असल्याने स्थानिक नेतृत्वाने ‘ताक फुंकून पिण्यास' सुरवात केली आहे. गावगाड्याच्या राजकारणावर पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे राजकीय अवलंबून असल्याने सगळ्याच राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. 

तालुकानिहाय दाखल अर्जांची संख्या 

तालुकानिहाय निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे असून (कंसात दोन दिवसांमध्ये दाखल झालेल्या उमेदवार अर्जांची संख्या दर्शवते) : नाशिक- २५ (२), त्र्यंबकेश्‍वर- ३ (०), दिंडोरी- ६० (८), इगतपुरी- ८ (१५), निफाड- ६५ (११), सिन्नर-१०० (२), येवला- ६९ (१६), मालेगाव- ९९ (१४), नांदगाव- ५९ (३), चांदवड- ५३ (०), कळवण- २९ (३९), बागलाण- ४० (६), देवळा- ११ (१). 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com