धक्कादायक.. नदीवर गेलेले आजी अन् नातू घरी परतलेच नाही...आजोबांनी शोध घेतला तर धक्काच

dagubai dane 1.jpg
dagubai dane 1.jpg

नाशिक : दगूबाई उत्तम दाणे (वय 60) या रविवारी सकाळी अकराच्या सुमारास नातू विशाल श्रीहरी चोळके (वय 14) याच्यासह दगडाच्या खाणीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या चुलत भावाच्या मुलाचे सावरगाव येथे लग्न असल्याने, दगूबाई यांचे पती उत्तम दाणे व अन्य नातेवाईक सावरगावला गेलेले होते. पण त्यानंतर जे काही घडले ते अंगावर काटा आणणारे होते.

अशी घडली घटना

दगूबाई उत्तम दाणे (वय 60) या रविवारी सकाळी अकराच्या सुमारास नातू विशाल श्रीहरी चोळके (वय 14) याच्यासह दगडाच्या खाणीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या चुलत भावाच्या मुलाचे सावरगाव येथे लग्न असल्याने, दगूबाई यांचे पती उत्तम दाणे व अन्य नातेवाईक सावरगावला गेलेले होते. तेथून परतल्यानंतर दाणे यांनी खाणीकडे जाऊन बघितले. त्यावेळी त्यांना खाणीतील पाण्यात दगूबाईंचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी याबाबत वस्तीलगतच्या रहिवाशांना माहिती दिली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी पोचून ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, दगूबाई यांच्या मुलीचा मुलगा विशाल हा तीन दिवसांपूर्वीच मोरझर (ता. नांदगाव) येथून साताळी येथे आजी-आजोबांकडे आला होता. रविवारी आजीसोबत खाणीवर गेला असताना तो पाय घसरून खाणीत पडला. त्याला वाचविण्यासाठी दगूबाई यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

दाणे दांपत्यांचा एकुलता मुलगा औरंगाबाद येथे नोकरीला आहे. त्यामुळे साताळी येथे पती-पत्नी शेतातच राहतात. तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवारी (ता. 25) सकाळी शवविच्छेदनानंतर आजी-नातवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

थेट सायंकाळी हा प्रकार उघडकीस

साताळी (ता. येवला) येथे दगडाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या आजी आणि नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी (ता. 24) सकाळी दोघे पाण्यात बुडाले. मात्र, दिवसभर कुणाच्याही लक्षात ही बाब आली नाही. थेट सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com