द्राक्ष व्यापाऱ्याने शेतकऱ्याला गंडविले! द्राक्ष थेट एक्सपोर्टला पाठवून दिले खोटे धनादेश

दीपक अहिरे
Wednesday, 7 October 2020

सततची नापिकी आणि आर्थिक संकट त्यानंतर कोरोनाच्या संकटात आधीच पिळवटून गेलेल्या शेतकऱ्याला आणखी किती धक्के सहन करावे लागणार? हाच प्रश्न अधांतरी आहे. भोळया भाबड्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक घटना सध्या घडत आहे. त्याकडे पोलीसांनी लक्ष देण्याची गरज आहे.

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : सततची नापिकी आणि आर्थिक संकट त्यानंतर कोरोनाच्या संकटात आधीच पिळवटून गेलेल्या शेतकऱ्याला आणखी किती धक्के सहन करावे लागणार? हाच प्रश्न अधांतरी आहे. भोळया भाबड्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक घटना सध्या घडत आहे. त्याकडे पोलीसांनी लक्ष देण्याची गरज आहे.

द्राक्ष व्यापाऱ्याने शेतकऱ्याला गंडविले

ओझर येथील आदित्य ॲग्रो एक्स्पोर्टचे संतोष गवळी (रा. शिवाजीनगर, ओझर) निलेश दवंगे (रा. खेडगाव), पंकज माधव मोहन (रा. ओझर) आदी व्यापाऱ्यांनी पिंपळगावचे द्राक्ष उत्पादक रमेश खैरे यांसह निफाड, दिंडोरी, इगतपुरी व चांदवड तालुक्यांतील सुमारे ७० द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे द्राक्ष एक्सपोर्टला पाठवून त्यांना खोटे धनादेश देत त्यांची २ कोटी, ४२ लाख, ४६ हजार ३०१ रूपयांची फसवणूक केली होती. उत्पादक पैसे मागत असताना संशयित त्यांना टाळत होते. नंतर ते फरार झाले. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो गुन्हा नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडे पुढील तपासकामी वर्ग केला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने फरार तीन व्यापाऱ्यांपैकी खेडगावला दवंगे यास नाशिक येथे बेड्या ठोकल्या.  

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकला ठोकल्या बेड्या

जिल्ह्यातील ७० द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास २ कोटी ४२ लाख ४६ हजार ३०१ रुपयांच्या फसवणूक केल्याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या तीन व्यापाऱ्यांपैकी निलेश दवंगे (रा. खेडगाव) या व्यापाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथे बेड्या ठोकल्या. न्यायालयाने या व्यापाऱ्यास १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा > ...म्हणून अधिकृत मेडिकलमधूनच खरेदी करा औषधे! रुग्ण व नातलगांना सतर्कतेचा इशारा

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grape merchant Arrested in Nashik marathi news