गुजरातमधील राजकीय नेत्याच्या खून प्रकरणातील संशयित नाशिकमध्ये ताब्यात 

jayram londhe gujrat suspect.jpg
jayram londhe gujrat suspect.jpg

नाशिक रोड : गुजरातच्या नानी दमण येथे एका राजकीय नेत्याचा खून झाला होता. या खुनानंतर संशयित फरारी झाले होते. त्यातील एक संशयित देवळालीगाव येथील गांधीधाममध्ये लपल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. 

राजकीय नेत्याचा खून प्रकरणी अटक

आठ महिन्यांपूर्वी गुजरातच्या नानी दमण येथे एका राजकीय नेत्याचा खून झाला होता. या खुनानंतर संशयित फरारी झाले होते. त्यातील एक संशयित जयराम लोंढे देवळालीगाव येथील गांधीधाममध्ये लपल्याची माहिती गुन्हे शाखेचे कर्मचारी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्याम भोसले यांना समजली. त्यांनी संग्रामसिंह निशाणदार, सहाय्यक आयुक्त समीर शेख, पोलिस निरीक्षक दिनेश बोर्डीकर यांना माहिती दिली. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत खातेले, देवकिसन गायकर, शंकर काळे, राजेंद्र घुमरे, राजाराम वाघ, अन्सार सय्यद, संजय ताजने, जयंत शिंदे, गुलाब सोनार, यादव डांबले, महेंद्र साळुंखे, योगेश सानप, गौरव गवळी आदींनी सापळा रचून जयराम लोंढे यास अटक केली. त्यांनतर त्याला गुजराथ पोलिसांच्या ताब्यात दिले.

आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

गुजरातमधील नानी दमण येथे आठ महिन्यांपूर्वी एका राजकीय नेत्याच्या खून प्रकरणी फरारी आरोपीला गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून देवळालीगावातील गांधीधाममध्ये अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com