अखेर खुलासा झालाच! चारचाकीच्या लालसेने केले थरारक कृत्य; दोघांवर गुन्हा दाखल

gurukrupa.jpg
gurukrupa.jpg

इंदिरानगर (नाशिक) : अखेर खुलासा झालाच...रात्रीच्या वेळी साधला डाव. चारचाकी पळून नेत मालकाचा केला निर्घूण खून. पोलिसांनी अवघ्या पाच तासात मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

इंदिरानगरमधील वडाळा-पाथर्डी रस्त्यावर असलेल्या श्री गुरुकृपा कार सर्व्हिसेसचे संचालक रामचंद्र रामपराग निषाद (वय ३७, रा.उत्तर प्रदेश) यांच्या डोक्यावर हत्याराने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ माजली. मेट्रो झोनसमोर असलेल्या या गॅरेजमध्येच ते वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास आकाश पवार गॅरेजमध्ये कामासाठी आला असता चारचाकी वाहने वॉश करण्याच्या रॅम्पवर फुटलेल्या अवस्थेत मोबाइल आढळून आला. तेथून काही अंतरावर गॅरेज चालक रामचंद्र यांच्या डोक्यावर गंभीर जखमा झालेल्या व मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. गॅरेजचे भागीदार मुरगन सिगमनी आणि आसपासच्या नागरिकांच्या मदतीने पोलिसांना कळविण्यात आले. 

असा झाला खुलासा

पोलिसांनी गॅरेजमध्ये कामाला असलेल्या आणि चार-पाच दिवसांपूर्वीच गावी निघून गेलेल्या रोशन कोटकर याचासह महेश लभडे (रा.निमगावमढ, चिंचोडी रोड, येवला) या संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असता त्यांना अटक करण्यात आली आहे. निषाद यांच्या डोक्यावर लोखंडी गजाने प्रहार करत मारेकऱ्यांनी रात्रीच्या सुमारास गॅरेजमध्ये असलेली चारचाकी घेऊन पळ काढला. माडसांगवी भागात ही गाडी त्यांनी सोडून दिली. पोलिसांनी गाडी जप्त करत या दोघांना देखील येवला येथून ताब्यात घेतले. अवघ्या पाच तासांत इंदिरानगर पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे.

नागरिकांत भीतीचे वातावरण

इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील मागील वीस दिवसांत खूनाची ही दुसरी घटना घडली. यापुर्वी पाथर्डीफाटा येथे पतीने पत्नीला गळा आवळून ठार मारल्याचे उघडकीस आले होते. या गुन्ह्याचा तपास पुर्ण होत नाही, तोच पुन्हा खूनाची दुसरी घटना ऐन दीपावलीच्या तोंडावर घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com