ब्रेकिंग : खळबळजनक! पाकिस्तानच्या ISI संघटनेला माहिती पुरवल्यावरून HALचा कर्मचारी नाशिकमधून ताब्यात; ATS ची कारवाई

nashik ats action 1.jpg
nashik ats action 1.jpg

नाशिक : देवळाली कॅम्‍पच्‍या लष्करी परीसराचे चित्रीकरण करणाऱ्या व्‍यक्‍तीस ताब्‍यात घेऊन अवघे काही दिवसच झालेले असतांना, नाशिकमध्ये पुन्‍हा एकदा मोठी कारवाई झालेली आहे. हिंदूस्‍तान ऍरॉनॉटिक्‍स लिमिटेड (एचएएल) मधून एका कर्मचाऱ्याला दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नाशिक युनीटने अटक केली आहे.

 पाकिस्तानच्या ISI संघटनेला माहिती पुरवल्यावरून HALचा कर्मचारी ताब्यात
संशयित व्‍यक्‍ती परदेशातील व्‍यक्‍तीच्‍या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्‍या विमानांची व त्‍याच्‍याशी संबंधित  संवेदनशील माहिती  तसेच हिंदूस्‍तान एरॉनॉटिक्‍स लिमिटेड या विमान बनविण्याच्‍या कारखान्‍यासंदर्भातील गोपनीय माहिती पुरवत असल्‍याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. यानंतर सखोल चौकशी केल्‍यानंतर एटीएस विभागाने धडक कारवाई करत संशयिताला अटक केली आहे. दरम्‍यान अटकेनंतर धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. संशयित हा ओझरला असलेल्या भारतीय बनावटीचे विमान बनविणार्या एचएएल कंपनीतील एक कर्मचारी असून, तो पाकिस्‍तानाच्‍या आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्‍या संपर्कात असल्‍याचे उघडकीस आले आहे.

तीन मोबाईल, पाच सिमकार्ड, २ मेमरी कार्ड जप्त

तो भारतीय बनावटीच्‍या विमानांची, संवेदनशील तांत्रिक तपशील, कारखाना परीसर व प्रतिबंधित क्षेत्रातील माहिती पाकिस्‍तान स्‍थिती आयएसआयला पुरवत होता. त्‍याच्‍यावर गुन्‍हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. त्‍याच्‍या ताब्‍यातून तीन मोबाईल, पाच सिमकार्ड, २ मेमरी कार्ड जप्त केले आहे. जप्त साहित्‍य विश्र्लेषणासाठी फॉरन्‍सिक विभागाकडे पाठविले असून, संशयिताला  न्‍यायालयात हजर केले असता सखोल चौकशीसाठी त्‍याला दहा दिवसांची पोलिस कोठणी सुनावली आहे. 

नाशिक एटीएसने आरोपीला बेड्या ठोकल्या

पाकिस्तान स्थित ISI या गुप्तहेर संघटनेस भारतीय बनावटीच्या विमानाची माहिती पुरविणाऱ्या हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्याला एटीएसने अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथक(एटीएस), नाशिक युनिट येथे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली की, एक इसम परदेशी व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची व त्याच्याशी संबंधीत संवेदनशील माहिती तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमाने बनविण्याच्या कारखान्या संदर्भातील गोपनीय माहिती परदेशी व्यक्ती पुरवत आहे. त्यानंतर या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक एटीएसने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

शासकीय गुपिते अधिनियम १९२३ अन्वये गुन्हा दाखल

दीपक शिरसाठ (४१) असं या आरोपी कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीवरून सखोल चौकशी केली असता असे निदर्शनास आले की, ओझर, नाशिक स्थित भारतीय बनावटीची विमाने बनविणाऱ्या हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीमधील एक कर्मचारी आरोपी हा  पाकिस्तानच्या ISI या गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानाच्या संवेदनशील तांत्रिक तपशिलाची, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या नाशिक येथील विमान कारखान्याची, सदर कारखाना परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची तसेच ट्रे गोपनीय माहिती पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संघटनेस पुरवत होता.  त्यावरून त्याच्या विरुद्ध कलम ३, ४, आणि ५ शासकीय गुपिते अधिनियम १९२३ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून 3 मोबाइल हँडसेट, ५ सिमकार्ड, दोन मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहे. सदर साहित्य विश्लेषणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथे पाठवण्यात आले आहेत.आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. ",

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com