"साहेब... रात्री ड्युटीवरून घरी परतणाऱ्या महिलांची सुरक्षा पुन्हा धोक्यात आहे" जेलरोडची घटना

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 19 मे 2020

लासलगाव जळीत हत्याकांडानंतर पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पेतून निर्भया पथकातील महिला पोलिसांनी रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडखानी करणाऱ्यांचे थेट स्टिंग ऑपरेशन जानेवारी महिन्यात करण्यात येत होते. यावेळी रोडरोमिओंच्या  मुसक्‍या आवळण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा ड्युटीवरून घरी परतणाऱ्या महिलांची सुरक्षा धोक्यात आहे.

नाशिक : लासलगाव जळीत हत्याकांडानंतर पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पेतून निर्भया पथकातील महिला पोलिसांनी रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडखानी करणाऱ्यांचे थेट स्टिंग ऑपरेशन जानेवारी महिन्यात करण्यात येत होते. यावेळी रोडरोमिओंच्या  मुसक्‍या आवळण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा ड्युटीवरून घरी परतणाऱ्या महिलांची सुरक्षा धोक्यात आहे.

असा घडला प्रकार

देशात कोरोनाने थैमान घातले असताना लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशातच ग्रीन किंवा ऑरेंज झोनमध्ये काही ठिकाणी नियम शिथिल करण्यात आल्याने कार्यालयेही सुरू करण्यात आले आहेत. अशातच रात्रीच्या वेळेस ड्युटीवरुन घरी जाणार्‍या महिलेचा पाठलाग करत तिघांनी तिचा विनयभंग केल्याची घटना जेलरोडवरील पंचक परिसरात शनिवारी (दि.१६) रात्री ९.३० वाजेदरम्यान घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी महिला दुचाकीने ड्युटीवरून घराच्या दिशेने येत असताना तीन संशियतांनी त्यांच्या दुचाकीचा पाठलाग केला. तिघांनी महिलेची दुचाकी अडवून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रर दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.एन. शेळके करत आहेत

संशयितांची नावे..

निखिल बोराडे (रा. पिंपळपट्टी, बोराडेमळा, जेलरोड ), पृथ्वीराज गायकवाड, उमेश बागुल (पुर्ण नाव पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांचे नाव आहे.

हेही वाचा > पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर सरपंचावर कोरोनाची मेहेरबानी...की आणखी काही? संशय कायम

महिलांची सुरक्षा पुन्हा धोक्यात

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पेतून निर्भया पथकातील महिला पोलिसांनी रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडखानी करणाऱ्यांचे थेट स्टिंग ऑपरेशन करून त्यांच्या मुसक्‍या आवळण्यात येत होत्या. ठक्कर बझार बसस्थानकात साध्या वेशातील महिला पोलिस अधिकाऱ्याचा पाठलाग करून अश्‍लील हावभाव करणाऱ्या संशयिताला जेरबंद केले होते. या घटनेला 24 तास उलटत नाहीत, तोच दुसऱ्या दिवशी रात्रीही निर्भयाच्या महिला पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक येथे रमेश जाधव यास अटक केली. त्यावेळी रात्री दहा ते बाराच्या दरम्यान निर्भया पथकाने पुन्हा सीबीएसबाहेर सापळा रचला होता. साध्या वेशातील महिला पोलिस रिक्षाची वाट पाहत होती. त्या वेळी संशयित रमेश जाधव याने तिच्याकडे पाहून शिटी वाजविली होती, तसेच तिचा पाठलागही केला होता. दबा धरून असलेल्या निर्भया पथकाने संशयित जाधवचे चित्रीकरण करून त्यास पकडले होते. 

हेही वाचा > दिलासादायक! नाशिक शहरात कोरोनाला लागतोय "ब्रेक'...ही आहेत कारणे.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harassment of a woman while return home from duty nashik marathi news