अल्पवयीन तरुणीला वारंवार बदनामीची धमकी देणे पडले महागात...वाचा काय घडले?

crime 123.jpg
crime 123.jpg

नाशिक : अल्पवयीन तरुणीला लॉजिंगवर नेऊन अश्लील छायाचित्र काढून एकाने युवतीचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. संशयिताने छायाचित्र व्हायरल केल्याने हा प्रकार पोलिसांत पोचला असून, या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

बदनामीची धमकी देऊन तरुणीचा विनयभंग

सचिन शंकर चौधरी (२३, रा. लोहशिंगवे, ता.जि. नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. संशयिताने तरुणीशी मैत्री करून हे कृत्य केले. संशयिताने तरुणीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर १ जानेवारी ते २ ऑगस्टदरम्यान त्याने मुलीस सिन्नर-घोटी मार्गावरील पांढुर्ली येथील एका लॉजवर घेऊन जात अश्लील छायाचित्र काढले. त्यानंतर छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी त्याने युवतीस त्याच लॉजवर नेले. मुलीने छायाचित्र डिलीट करण्यास सांगितले असता त्याने मारहाण करीत छायाचित्र नातेवाइकांसह सोशल मीडियावर व्हायरल केल्याने हा प्रकार पोलिसांत गेला असून, या प्रकरणी विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक एस. एन. देशमुख तपास करीत आहेत.

रिपोर्ट - विनोद बेदरकर

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com