नयनरम्य! निसर्गात हरवलेला 'हरसूल घाट' पर्यटकांना खुणावतोय...एकदा पाहाच

राम खुर्दळ
Thursday, 17 September 2020

वाघेरा गावाच्या पाठीला असलेल्या चक्रधर किल्ल्याचे दर्शन होते. घाटाच्या सुरवातीलाच महर्षी विठ्ठलराव पटवर्धन आश्रमशाळा आहे तेथून सुरू होणारा घाट पुढच्या चार-पाच किलोमीटरपर्यंत गर्द निसर्ग रम्य वातावरणाने सजला आहे. त्यामुळे घाटात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. 

नाशिक : (गिरणारे) महिनाभरातील संततधारेनंतर हरसूल घाट वनराजीने फुलला आहे. गर्द हिरवीगार झाडी, हळुवार बरसणारे धबधबे, वळणदार रस्ते, विविध फुले, पक्षी, फुलपाखरे, रानभाजी विक्रेते दूरवर खोलवर दिसणारे आदिवासी पाडे, वस्त्या, धरणे, निसर्गात हरवलेला चार किलोमीटरचा हरसूल घाट पर्यटकांना खुणावत आहे. 

घाटात पर्यटकांची गर्दी

नाशिकपासून ४५ किलोमीटरवर हरसूल घाट सध्या हिरव्या वनराजीने फुलून गेला आहे. गिरणारे भागातून हरसूलला जाताना काश्यपी, कोणे, वाघेरा धरणांचा रम्य परिसर दिसतो. वाघेरा गावाच्या पाठीला असलेल्या चक्रधर किल्ल्याचे दर्शन होते. घाटाच्या सुरवातीलाच महर्षी विठ्ठलराव पटवर्धन आश्रमशाळा आहे तेथून सुरू होणारा घाट पुढच्या चार-पाच किलोमीटरपर्यंत गर्द निसर्ग रम्य वातावरणाने सजला आहे. त्यामुळे घाटात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

ठिकठिकाणचे अनेक पर्यटक हौशी मंडळींचा घाटात राबता आहे. येथील पर्यटन स्थळे विकासाकडे लक्ष दिल्यास, स्थानिक आदिवासी गावांना रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागणार नाही. स्थानिक रोजगार संधी मिळतील. वनौषधी, रानभाज्या, सेंद्रिय भाजीपाला व नैसर्गिक शेती, पर्यटन शेतीसारखे प्रयोग या भागात राबविण्याची मागणी आहे.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harsul Ghat lost in nature nashik marathi news