बछडा दिसताच औत सोडून शेतकऱ्याचा पळ; अंबासन शिवारात भीतीचे सावट

he saw leopard then he ran away nashik ambasan marathi news
he saw leopard then he ran away nashik ambasan marathi news

नाशिक / अंबासन : येथील शिवारात बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहेत. शिवारातील एका युवा शेतकऱ्याला बिबट्याचा बछडा आढळल्याने शेतात सुरू असलेले औत सोडून पळ काढला तर तळवाडे येथे बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्याची घटना घडली. 
 

पायाखालची जमीनच सरकली

परिसरातील पिकं जसजशी मोठी होऊ लागली तसा हिंस्र प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. वळवाडे परिसरातील वाघ शिवारात युवा शेतकरी सागर कोर आपल्या शेतात (गट क्रमांक ६३१) कांदा लागवडीसाठी मशागत करीत असताना सायंकाळी पाचच्या सुमारास शेजारी लागवड केलेल्या मका पिकातून अचानक बिबट्याचा बछडा बाहेर पडला. बेसावध असलेल्या श्री. कोर यांच्या लक्षात येताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी कुठलीही विचार न करता जागेवरून औत सोडून पळ काढला. घाबरलेल्या अवस्थेत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिली. 
 

मादीसह बछड्यांचे वास्तव्य

शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनी करून माहिती दिली. शेतात वनमजूर नाना ठाकरे हे दाखल झाले त्यांना बछड्याचे ठसे दिसून आले तसेच संपूर्ण परिसरात मका, बाजरीचे पीक असल्याने सागर कोर यांच्या शेतात बिबट्याच्या मादीसह बछड्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले. या परिसरात शेतकरी शेतात ठिकठिकाणी वस्ती करून राहत आहेत. यामुळे बिबट्या हल्ला करण्याची शक्यता असल्याने वनविभागाने पिंजरा लावत बिबट्या व बछड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 
 

फवारणी पंपामुळे प्राण वाचले

दरम्यान तळवाडे भामेर येथील शेतकरी सुपन मुरलीधर गायकवाड यांच्या मालकीच्या दोन शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार केल्याची घटना घडली असून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला तर अंबासन येथील शेतकरी संतोष आहिरे यांना तब्बल एक तास बिबट्याने घेराव घातला होता. सुदैवाने त्यांच्या पाठीवर फवारणी करण्यासाठी पाठपंप असल्याने बिबट्या थांबला. श्री. आहिरे यांनी गावातील तरुणांना भ्रमणधनी करीत पाचारण केले व बिबट्यापासून सुटका करून घेतल्याचे सांगितले. 
 

गुंजाळनगरला शेतकऱ्यावर हल्ला
(मोठाभाऊ पगार) 
देवळा : गुंजाळनगर, ता. देवळा शिवारात बिबट्याने येथील अशोक गुंजाळ यांच्यावर हल्ला केल्याने येथील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. गुंजाळनगर ते सुभाषनगर रस्त्यालगत रेस्ट हाऊसच्या पाठीमागे दोन-तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यात काल अशोक गुंजाळ यांच्यावर हल्ला झाल्याने शेतातील काम करण्यास शेतमजूर येण्यास कचरत आहेत. तरी वन विभागाने सदर ठिकाणी तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com