धक्कादायक!  25 हजार लोकसंख्येचं आरोग्य चक्क एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर अवलंबून??

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 17 June 2020

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वणी येथील ग्रामीण रुग्णालयास सोमवारी (ता. 15) भेट देऊन पाहणी केली असता रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक 15 दिवसांपासून रुग्णालयात फिरकले नसल्याचे समजले. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदारांनी थेट जिल्हा शल्यचिकित्सांना संपर्क साधत येथील परिस्थितीबाबत विचारण केली

नाशिक / वणी : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वणी येथील ग्रामीण रुग्णालयास सोमवारी (ता. 15) भेट देऊन पाहणी केली असता रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक 15 दिवसांपासून रुग्णालयात फिरकले नसल्याचे समजले. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदारांनी थेट जिल्हा शल्यचिकित्सांना संपर्क साधत येथील परिस्थितीबाबत विचारण केली. संबंधित वैद्यकीय अधीक्षक रजेवर नसल्याचे त्यांना कळताच त्यांचा पारा चढला. 

आरोग्य यंत्रणा खडबडून जागी

विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी वणी येथील ग्रामीण रुग्णालयास दिलेल्या भेटीनंतर येथील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्स डॉ. सुरेश जगदाळे यांनी रुग्णालयास भेट देत येथील परिस्थितीचा आढावा घेतला असता अवघ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यावरच 25 हजार लोकसंख्या असलेल्या वणीच्या ग्रामीण रुग्णालयाची भिस्त असल्याचे समोर आले.यानंतर झिरवाळ यांनी रुग्णालयातील परिस्थितीबाबत आढावा घेण्याची सूचना केली. या प्रकारानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगदाळे यांनी तत्काळ सायंकाळी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. या वेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विनापरवानगी रजेवर गेल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तातडीने वैद्यकीय अधिकारी, उपस्थित परिचारिका व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सूचना करत डॉ. अरुण पवार यांच्यावर कारवाईचे संकेत दिले. 

सहा महिन्यांपासून रजेवर 
वणी येथील ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकारी अशी पदे असून, यापैकी एक वैद्यकीय अधिकारी सहा महिन्यांपासून विनापरवानगी रजेवर आहेत, तर दुसरे वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने आणि त्यात त्याचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने क्वारंटाइन झाले आहेत.

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

रिक्त पदे तातडीने भरण्याची ग्रामस्थांची मागणी ​

त्यामुळे सुमारे 25 हजारांवर लोकसंख्येचा भार वणी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर मोरे यांच्या एकट्यावरच आहे. कोरोनाबाधित रुग्णामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आणि त्यात एकच डॉक्‍टर उपलब्ध असल्याने ग्रामस्थांनी तत्काळ ही पदे भरण्याची मागणी केली.  यानंतर विनापरवानगी रजेवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासह येथील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health of 25,000 people depends on a single medical officer at vani nashik marathi news

टॉपिकस