लष्काराच्या हद्दीत हायअलर्ट.. चेकपोस्टवर सैनिकांचा ताबा!

check post nashik.jpg
check post nashik.jpg

नाशिक / देवळाली कॅम्प : कोरोनाने शहरालगत असलेल्या लष्कराच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर लष्कर प्रशासन सर्तक झाले असून परिसरात हायअलर्ट घोषित करण्यात आले आहे. कोरोनावर मात करण्याकरीता लष्कर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून आवश्‍यक ती सर्व खरबदार घेतली जात आहे. कॅम्प पसिरात मेडिकल स्टोअर वगळता संपूर्ण परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. कन्टोंमेंट झोन जाहीर केलेल्या भागांत आरोग्य विभागातर्फे प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी होणार आहे. 

लष्काराच्या हद्दीत हायअलर्ट 
देवळाली कॅम्प परिसरात कोरोनाबाधितांची संख्या एकवरून सात झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पहिला कोरोनाबाधित लष्करातील अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 13 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यात सात जणाचे आवाहल पॉझिटिव्ह आले. या सर्वांना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे. यातील एक बाधित शिंगवेबहुला येथील असून, तो लष्करी अधिकाऱ्याकडे कामास होता. 

परिसराची पाहणी; चेकपोस्टवर सैनिकांचा ताबा 
लष्करी हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मेजर जनरल जे. एस. बिंद्रा, बिग्रेडियर जे. एस. गोराया, तहसीलदार दौडे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. जायभावे, कॅन्टोन्मेटचे आरोग्य अधिकारी राजेंद्र ठाकूर यांच्यासह सात ते आठ वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी एकत्रित चर्चा करत बाधित क्षेत्र असलेल्या धोंडी रोड, शिंगवेबहुला, ग्यानी एनक्‍लवे, चुशुल एनक्‍लवे, सप्लाय डेपो, एसी पॉवर हाउस आदी परिसराची पाहणी केली. लष्करी विभाग व शिंगवेबहुला असे दोन कॅन्टोन्मेंट झोन जाहीर केले. या झोनमधील प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाणार आहे. 


प्रवेशद्वारावरच लष्काराचे जवान 
 कोरोनाने देवळालीसह लष्करी विभागातही शिरकाव केल्याने लष्करी प्रशासन कॅन्टोन्मेट बोर्डासह लष्कर हद्दीत आजूबाजूस असणाऱ्या विहितगाव, देवळालीगाव, देवळाली कॅम्प, भगूर, वडनेर, दाढेगाव, पिंपळगाव खांब, संसरी गाव, डोबी मळा या ग्रामीण भागातही सध्या भीतीचे वातावरण आहे. लष्करी हद्दीत सध्या हाय अलर्ट घोषित असून, आर्टिलरी सेंटर व सैन्य दल प्रशिक्षण केंद्राच्या सीमांवर बंदोबस्त आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने देवळालीतील रस्ते सध्या बंदिस्त केले आहेत. संसरी नाक्‍यापासून पोलिसांची जादा कुमक सध्या रस्त्यावर तैनात आहे. सैन्यदल प्रशिक्षण केंद्र व देवळाली कॅम्पमधील प्रशासकीय भागांच्या प्रवेशद्वारावर सध्या सैन्यदलाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची सध्या चौकशी होत आहे. सैन्य दलात असणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना बाहेर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. 

हेही वाचा > वाह! पोलिसदादा मनचं जिंकलं की हो...वेळप्रसंगी फावडं घेऊन थेट लागले कामाला!

एक पोलिसही ताब्यात 
  शिंगवेबहुला गावातीलच पोलिस कर्मचारी मालेगाव येथे कार्यरत असून, तो मंगळवारी (ता. 5) गावात आला. मात्र आपण गावात आल्याने त्याने स्थानिक पोलिस ठाण्यास कळविले नाही. यानंतर नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना देताना त्या पोलिसास स्थानिक पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com