कांद्याच्या बियाण्याला उच्चांकी भाव 

NRS20A01118_pr.jpg
NRS20A01118_pr.jpg


सुदाम गाडेकर : सकाळ वृत्तसेवा 
नाशिक/ नगरसूल :
गेल्या वर्षाच्या हंगामात सुरूवातीला कांद्याचे भाव चांगले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव फैलावला. सरकारी धोरणामुळे वाहतूक बंद होऊन कांद्याचे भाव गडगडले. येत्या वर्षात सर्वकाही सुरळीत होईल, अशी शेतकऱ्यांना आशा असल्याने सध्या कांद्याचे बियाणे पेरणीचे काम सुरू आहे. त्यातच काहींनी पेरलेले बियाणे पावसामुळे मातीत दबले आहे, तर काही ठिकाणी उतरून पडलेले बियाणे सरींमध्ये पाणी साचून सडत आहे. अर्थात अजूनही बियाणे टाकण्याची वेळ असल्याने कांदा बियाणे शेतकऱ्यांकडून खरेदी केले जात आहे. 
पैसा कुठून आणावा 
खासकरून कांद्याचे बियाणे शेतकरी शेतकऱ्यांकडूनच विकत घेतात; कारण ते खात्रीचे बियाणे असते. सध्या मात्र बियाण्याचे मागणी आणि पुरवठ्याचे गणित व्यस्त झाल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे चांगल्या बियाण्याला मोठी किंमत मोजावी लागत आहे. यंदा पतसंस्था आणि बॅंकांनी पतपुरवठा करताना हात आखडता घेतल्याने शेतकऱ्यांपुढे बियाणे खरेदीसाठी पैसा कुठून आणावा, असा प्रश्न उभा राहिला आहे. 
योग्य भाव मिळण्याची आशा 
उधार - उसनवारी करून काहीजण बियाणे खरेदी करत आहेत ते येणाऱ्या काळात कांद्याला योग्य भाव मिळेल या आशेवरच. त्यासाठी ते बियाण्याच्या प्रतीनुसार सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये पायलीचा भाव कांद्याच्या बियाण्याला मोजत आहेत. शेतीमालाचे घसरलेले भाव व बॅंका व पतसंस्थाद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक भांडवल मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.


खात्रीशीर बियाण्याची शेतकऱ्यांकडून शोधाशोध 

कांदा हे येवला तालुक्‍यातील मुख्यपीक आहे. मात्र कांदा बियाणे उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य शेतकरी अडचणीत आहे. कृषी विभागाने प्रमाणित बियाणे माफक दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे येवला तालुकाध्यक्ष श्रावण देवरे यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com