ramkund.jpg
ramkund.jpg

नाशिकमध्येही रामायण पेटले..! गुन्हे दाखल केले तरी रामकुंडावर महाआरती होणारच.. हिंदुत्ववादी संघटनांचा पवित्रा

नाशिक : ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.२०० निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. दुसरीकडे रामाची नगरी असलेल्या नाशिकमध्येही रामायण पेटले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी जिल्ह्यातील मंदिरं खुली करा, अशी मागणी  आखाडे, पुरोहित संघ,विहिप, हिंदू संघटनांनी केली आहे.

परवानगी नाही दिली तरी विधिवत कार्यक्रम करणारच,

अयोध्येत भूमिपूजन पार्श्वभूमीवर नाशकात रामकुंडावर महाआरती आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागण्यात आली आहे. परंतु, कलम 144 लागू असल्याने जिल्ह्याधिकाऱ्यांनी परवानगी देण्यास नकार दिला आहे. राज्यात आधीच कोरोनाची परिस्थितीत असल्यामुळे खबरदारी घेतली जात आहे.  मात्र, परवानगी नाही दिली तरी विधिवत कार्यक्रम करणारच, या भूमिकेवर महंत ठाम आहे. आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी महाआरती होणारच असा पवित्रा सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला आहे.

रामाची नगरी असलेल्या नाशिकमध्येही रामायण पेटले

राम मंदिराचे भूमिपूजन आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. दुसरीकडे रामाची नगरी असलेल्या नाशिकमध्येही रामायण पेटले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी जिल्ह्यातील मंदिरं खुली करा, अशी मागणी  आखाडे, पुरोहित संघ,विहिप, हिंदू संघटनांनी केली आहे.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com