"ही राजकारण करण्याची वेळ नाही" गृहमंत्री अनिल देशमुख नाशिक दौऱ्यावर..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

गृहमंत्री म्हणाले, एकंदरीत परिस्थितीवर मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करू आणि निर्णय घेऊ. सध्या सर्व यंत्रणा आणि राजकीय पक्ष यांनी सोबत काम करण्याची गरज आहे,ही राजकारण करण्याची वेळ नाही. गडकरी यांनीही म्हंटल होत राजकारण करू नका आणि हेच त्यांच्या पक्षांच्या लोकांनी पालन करावे

नाशिक : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊनची स्थिती आहे. अशातच गृहमंत्री अनिल देशमुख आज (ता.२९) नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व त्या अनुषंगाने उपाययोजना याचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त, विशेष पोलीस महानिरिक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, मालेगावमध्ये वाढती रुग्णसंख्या व कायदा सुव्यवस्था याबाबत आढावा यावेळी गृहमंत्र्यांनी घेतला

 गृहमंत्री अनिल देशमुख़ म्हणाले
राज्यात सर्व प्रशासन यंत्रणा दिवसरात्र लढत असून नाशिकमध्ये जिल्ह्याच्या आढावा घ्यायला आलो आहे.

-  मालेगावमध्ये अधिक पोलिस, डॉक्टर लागणार का हे बघू 
-परिस्थिति लवकर कशी आटोक्यात आणता येईल हे बघू
-मालेगावात १८००  पोलिस तैनात केले असून एसआरपीएफ पण वाढवू लागली तर 
- फ्रंट लाईनला काम करणाऱ्या पोलिसांना पीपीई किट आम्ही देतोय तसेच -कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांना 50 लाख आणि नोकरीही देऊ. -कोरोनाबाधित रुग्णांसाठी एक कक्ष स्थापन केलाय. काही अडचण असेल तर तिथे पोलिसांनी सांगावे.

-महाराष्ट्र तसेच मुंबईत परप्रांतीय जास्त आहे, त्यांना त्यांच्या गावाला पाठवायला हवं अशी इच्छा आहे.

-एकंदरीत परिस्थितीवर मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करू आणि निर्णय घेऊ. सध्या सर्व यंत्रणा आणि राजकीय पक्ष यांनी सोबत काम करण्याची गरज आहे,

-ही राजकारण करण्याची वेळ नाही. गडकरी यांनीही म्हंटल होत राजकारण करू नका आणि हेच त्यांच्या पक्षांच्या लोकांनी पालन करावे.

हेही वाचा > धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..

हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Anil Deshmukh to visit Nashik to review Corona situation nashik marathi news