गंगा घाटावर बेघर व्यक्तीने संपविली जीवनयात्रा; परिसरात चर्चेला उधाण

ganga ghat123.jpg
ganga ghat123.jpg

नाशिक : नाशिकचा गंगाघाट परिसर तसा नेहमीच गजबजलेला..सदैव याठिकाणी नागरिकांची वर्दळ...कोणी पुजेसाठी किवा विविध कारणांसाठी लांबून लोकं येत असतात. पण त्यादिवशी असे काही घडले ज्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले होते.

पहाटेचा प्रकार; परिसरात चर्चा

शांताराम लिलके (रा. गंगाघाट) हे गृहस्थ गंगा घाट परिसरात उघड्यावर राहत होते. त्यादिवशी सकाळीच दयानंद सावंत हे नदीवरती जात असताना त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसला. रविवारी पहाटे लिलके यांनी येथील ओम गुरूदेव या हॉटेलच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. त्यांनी पंचवटी पोलीसांना कळवताच पोलीसांनी दाखल होत पंचनामा केला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

अकस्मात मृत्युची नोंद

गंगा घाट परिसरात उघड्यावर राहणार्‍या एका बेगर व्यक्तीने हॉटेलच्या शेडमध्ये आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२०) पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शांताराम लिलके (रा. गंगाघाट)असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com