esakal | रिक्षाचालकाने घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन! महिलेचा मोबाईल केला परत
sakal

बोलून बातमी शोधा

honest rickshaw driver.jpg

अनिता घनसावत या रिक्षाने लेखानगरला उतरल्यानंतर रिक्षाभाडे अदा करून निघून गेल्या. आपला मोबाईल रिक्षातच राहिल्याचे अनिता यांच्या लक्षात आले.

रिक्षाचालकाने घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन! महिलेचा मोबाईल केला परत

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : महिलेचा रिक्षात विसरलेला मोबाईल रिक्षाचालकाने पोलिस ठाण्यात आणून दिल्याने अंबड पोलिसांनी रिक्षाचालकाचे कौतुक केले. 

रिक्षाचालकाने घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन!

अनिता घनसावत (रा. रामकृष्णनगर, एक्स्लो पॉइंट) प्रदीप पराते (रा. पंचवटी, मखमलाबाद) यांच्या रिक्षाने लेखानगरला उतरल्यानंतर रिक्षाभाडे अदा करून निघून गेल्या. आपला मोबाईल रिक्षातच राहिल्याचे अनिता यांच्या लक्षात आले. त्यांनी अंबड पोलिसांत संपर्क साधला. या वेळी पोलिस नाईक पवन परदेशी यांनी महिलेच्या मोबाईलवर संपर्क केला. पराते यांनी तो फोन उचलून महिलेचा मोबाईल रिक्षातच राहिल्याचे सांगितले. त्यांनी अंबड पोलिस ठाण्यात येऊन मोबाईल पोलिसांसमक्ष महिलेच्या स्वाधीन केला. या वेळी पोलिस शिपाई रवींद्र कोळी, पोलिस नाईक योगेश रेवगडे उपस्थित होते. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ