कौतुकास्पद! जेव्हा एक गृहिणी सराईत गुन्हेगारांना पकडते; कामगिरीने आयुक्तही आचंबित

jyoti sonar.png
jyoti sonar.png

नाशिक : पुरुषांनाही लाजवेल अशी धाडसी कामगिरी महिला देखील करु शकता, हे एका गृहिणीने पुन्हा एकदा पटवून दिले आहे. सोमवारी पती गुलाब यांच्यासोबत जीव धोक्यात घालून ज्योती यांनी मोठ्या धाडसाने चोरांना पकडले. या कामगिरीचे आयुक्तांनी देखील कौतुक केले. वाचा काय घडले नेमके?

जीवाची पर्वा न करता केलं धाडस

गुन्हे शाखेच्या युनिट-2 मध्ये कार्यरत असलेले गुलाब सोनार हे रजा घेऊन कौटुंबिक कामासाठी संगमनेरला गेले होते. पत्नी ज्योती सोनार सोबत नाशिकला परतत असताना नांदूरशिंगोटेच्या पुढे काही अंतर आल्यानंतर काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दोघे युवक दुचाकीने (एम.एच 08 एल पी 5347) सुसाट वेगाने पुढे जात असल्याचे दिसले. यावेळी ज्योती सोनार यांनी पतीला सहकार्य करत मोठ्या शिताफीने चोरांना पकडले. सोनार यांनीही आपल्या गाडीचा वेग वाढवून त्यांच्या दुचाकीच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. ज्योती यांनी यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले सोनसाखळी दुचाकी चोर आणि रस्त्यावर दुचाकीने जाणारे हे दोघे एकच असल्याची खात्री केली. ते चोर आहेत असं कळताच उपस्थित लोकांनी काढता पाय घेतला. मात्र सौ. ज्योती यांनी मोठ्या हिंमतीने पती गुलाब यांना मदत करत दोघा चोरट्यांना शिताफीने पकडले.

गृहिणीच्या हिंमतीचे कौतुक...

सौ. ज्योती यांचे वडील धर्मराज वाघ हे पोलिस होते. वडिलांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक धाडसी कामे केली आहेत. ते त्या लहानपणापासून ऐकत आल्या. सोमवारी जेव्हा संबंधित चोरटे दिसले तेव्हा त्यांनी मोठ्या धाडसाने पतीला सहकार्य केले. यावेळी ज्योती यांनी सगळी घटना मोबाईमध्ये चित्रीत केली. त्या चोरट्यांनी खिशातून चाकू अन् चिली स्प्रे देखील काढण्याचा प्रयत्न केला मात्र या धाडसी दाम्पंत्याने त्याचा डाव उधळून लावला. अखेर काही वेळातच नाशिकच्या क्राईम ब्रॅंचची टीम आली. त्यानंतर आम्ही दोघे निर्धास्त झालो असे सौ. ज्योती यांनी सांगितले. `ती`च्या या थराराने पोलिस आयुक्त दीपक पांडे देखील आचंबित झाले. त्यांनी या दाम्पत्याचा सत्कार केला.

मी एक गृहिणी आहे. सोमवारी मी धाडसाने चोरांना पकडले, मात्र त्यांच्याकडील हत्यारे व त्यांचा अवतार पाहिल्यावर नंतर मात्र माझी अवस्थाही बिकटच झाली होती, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. सध्या मात्र अनेक लोक अभिनंदन करतात. त्यामुळे बरे वाटते, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com