दारणेकाठच्या भागात बिबटे येतात तरी कुठून? भयभीत ग्रामस्थांचा सवाल

leopard.jpg
leopard.jpg

नाशिक रोड : दारणा नदीकाठच्या गावांमध्ये आतापर्यंत आठ बिबटे पिंजऱ्यात जेरबंद झाले आहेत. मात्र त्यानंतरही बिबटे दिसण्याच्या घटना कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे बिबट्यांचे नंदनवन बनलेल्या या भागात अजून बिबटे आहेत तरी किती? हा प्रश्न नागरिकांना पडत आहे

सापळे लावूनही सापडत नाहीत

दारणा नदीकाठी दोनवाडे भगूर, राहुरी, जाखोरी, चांदगिरी, बाभळेश्‍वर, चेहेडी, पळसे, सामनगाव, कोटमगाव, साखर कारखाना परिसरात ठिकठिकाणी बिबटे सापडू लागले आहेत. लोकांच्या घरात वयोवृद्ध, बालकांवर हल्ले करण्यापासून तर विहिरीत अडकून पकडले जाण्यापर्यंत अनेक प्रकारांत बिबट्यांचा संचार पुढे आला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात चार चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दहा ठिकाणी पिंजरे लावले होते. तब्बल १५ कॅमेरे आणि डझनभर सापळे लावूनही सापडत नसलेले बिबट्या सध्या ठिकठिकाणी सापडू लागले आहेत. 

महिनाभरात आठ बिबटे जेरबंद

महिनाभरात आठ बिबटे जेरबंद झाली आहेत. तरीही बिबटे सापडण्याचे व दिसण्याचे प्रमाण सुरू आहे. त्यामुळे किमान डझनभर तरी बिबटे या भागात वास्तव्यास आहेत. असेच पुढे आले आहे. बिबट्यांसाठी नंदनवन झालेला हा परिसर शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी मात्र अडचणीचा सामना करणारा भाग ठरत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली  वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, वनपाल अनिल आहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे, वैभव बोगले यांनी ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद केले आणि जेरबंद केलेल्या बिबट्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. परिणामी वन विभागाकडून बिबट्या जेरबंद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे. मात्र नेमके अजून बिबटे किती आहेत, हे कळत नाही. 

इन्फोबॉक्स 
- दोन मळ्यांतून बालकांना बिबट्यांनी उचलले. 
- दोन बालक आजोबा-आजींमुळे वाचले 
- पिंजऱ्यात आतापर्यंत दहा बिबटे सापडले 
- बछड्यांसह फिरणाऱ्या बिबट्यांचा संचार सुरूच 

रिपोर्ट - अंबादास शिंदे

संपादन - रोहित कणसे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com