पावसाचा पुन्हा दणका! जिल्ह्यात ढगफुटी सदृश पावसाने पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

शनिवारी झालेल्या पावसाने शहरात पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्यात हजेरी लावल्यानंतर रात्री उशिरा पूर्व पट्ट्यात जोरदार बरसात केली. विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने शहर-जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक भागातील जनजीवन विस्कळित झाले होते.

नाशिक : शहर-जिल्ह्यात शनिवारी (ता.१९) मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाचा अंदाज अचूक ठरविताना शनिवारी पश्‍चिम पट्ट्याशिवाय पूर्व पट्ट्यातील चांदवड, मालेगाव, देवळा, नांदगाव, मनमाड, अभोणा, दिंडोरी आदी भागात दीड ते दोन तासांहून अधिक काळ संततधार होती. त्यामुळे या भागातील नदी-नाल्यांना पूर आले. काही घरांत पाणी शिरले. अनेक गावांनी दहा वर्षांनंतर प्रथमच एवढा मोठा पाऊस अनुभवला.

अनेक भागातील जनजीवन विस्कळित

रात्री अकराला नांदूरमध्यमेश्‍वर धरणातील विसर्ग दुपटीने वाढून चार हजार ३५ क्यूसेक, तर दारणा धरणातून ५५० क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला. शनिवारी (ता. 19) झालेल्या पावसाने शहरात पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्यात हजेरी लावल्यानंतर रात्री उशिरा पूर्व पट्ट्यात जोरदार बरसात केली. विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने शहर जिल्ह्यातील  वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक भागातील जनजीवन विस्कळित झाले होते. पावसाच्या दमदार हजेरीमुळे पूर्ण भरलेल्या धरणातून विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

चार हजार कोंबड्या मृत  

रेडगाव खुर्द येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसाने रायपूर तालुका चांदवड येथील निर्मला राजाराम गुंजाळ यांचे पोल्ट्री शेडमध्ये ते पूर्ण पानी घुसल्याने विक्रीसाठी पक्व असलेले साधारण चार हजार कोंबड्या(पक्षी) मृत झाले तसेच 250 गोण्या पशुखाद्य ही भिजल्याने सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

तसेच रखमाबाई रंगनाथ कोल्हे यांचे अंदाजे 30 गुंठे कांदा लागवड केलेले क्षेत्र वाहून गेले रंगनाथ लक्ष्मण घोरपडे यांचे मिरची आणि कोबी लागवड केलेले 35 ते 40 गुंठे जमीन क्षेत्र वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे हे संबंधित घटनेचा पंचनामा तलाठी जनार्दन उशीर रायपूर प्रशासक ज्ञानेश्वर सपकाळे माजी सरपंच पुंडलीक गुंजाळ पोलीस पाटील साहेबराव नारळे प्रदीप गुंजाळ यांनी केला. या परिसरात नुकसानीची संख्या खूप मोठी आहे.

बाणगाव येथे शनिवारी रात्री मुसळधार पावसाने लागवड केले कांदे वाहून गेले

कांदा पीकाचे झालेले नुकसान

चांदवड तालुक्यातील अनेक गावांत रात्री तीन तास चाललेल्या मुसळधार पावसामुळे  शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. लाल कांद्याचे पीक पाण्यात गेल्याने झालेल्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक भडाणे, रायपूर, दरसवाडी, पिंपळे, कळमदरे, सुतार खेडे, दुगाव , पिंपळगाव धाबळी, आहेरखेडे, निमोण, निंबाळे, रेडगाव,  मेसनखेडे आदी  गावांत प्रचंड नुकसान, अनेकांचे शेतातील पिकांसह जमीन खरडून वाहून गेली.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

रेडगांव ता. चांदवड काढणीला आलेले सोयाबीन खराब झाले

खेडलेझुंगे काल रात्रीच्या मुसळधार पाऊसाने मका पिकातून पाणी वाहताना

दिघवद ता. चांदवड रोकडोबा वस्ती येथे कांदा पिक वाहुन गेले

No photo description available.

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Huge loss to farmers due to torrential rains in the district nashik marathi news