माणुसकीही गहिवरली! महामार्गावर "ती'' शेवटची घटका मोजताना...पिल्लाचा जीव वाचवण्याची धडपड! अन्..

प्रमोद दंडगव्हाळ : सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 March 2020

आजच्या या धकाधकीच्या जीवनातही माणुसकी हरवल्याचे बोलले जात असताना यानिमित्ताने आजही प्राण्यांबाबत प्राणी प्रेम अजूनही जिवंत असल्याचे ज्वलंत उदाहरण यानिमित्ताने बघायला मिळाले. याबाबतची चर्चा दोन दिवसापासून नाशिक पंचक्रोशीत ऐकला मिळत आहे.

नाशिक / सिडको : आजच्या या धकाधकीच्या जीवनातही माणुसकी हरवल्याचे बोलले जात असताना यानिमित्ताने आजही प्राण्यांबाबत प्राणी प्रेम अजूनही जिवंत असल्याचे ज्वलंत उदाहरण यानिमित्ताने बघायला मिळाले. याबाबतची चर्चा दोन दिवसापासून नाशिक पंचक्रोशीत ऐकला मिळत आहे.

असा घडला प्रकार... माणुसकीचे उदाहरण..!

रात्रीच्या वेळी 7:30 वाजेच्या दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावरील विल्होळी ते वाडीवऱ्हे दरम्यान गर्भवती असलेल्या गोमातेला भरधाव चारचाकी वाहनाने उडविले. त्यानंतर तिला काही वेळाने पुन्हा दुचाकीने धडक दिली. ती बेशुद्ध अवस्थेत महामार्गावर रस्त्याच्या मधोमध जखमी अवस्थेत पडून आपला व आपल्या पिल्लाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती. परंतु काही करता तिला उठता येईना. तेवढ्यात लग्नसमारंभ आटपून नाशिककडे जाणाऱ्या एका वाहनातील डॉक्टर व शिक्षक मंडळींना हा  प्रकार बघायला मिळाला. त्यांनी क्षणाचा उशीर न करता तातडीने माणुसकी पोटी आपले वाहन महामार्गाच्या रस्त्याच्या कडेला थांबविले व धावपळ करतात त्या मुक्या जनावरांच्या मदतीला धावून गेले. रस्त्याच्या मधोमध असलेल्या त्या गोमातेला प्रथम रस्त्याच्या कडेला कसेबसे प्रयत्न करत बाजूला आणले. आपल्या प्राणाची शेवटची घटका मोजत व हुंदके देत असताना वाहनातील पाण्याची बाटली आणली व आपल्या मित्रांच्या मदतीने गाईचे तोंड उघडत पाणी पाजले.

..आणि त्या गर्भवती गाईचे अखेर प्राण वाचले

प्राथमिक उपचार म्हणून जवळ असलेला चुना तिच्या जखमेवर लावला. गाडीतील कापड त्या जखम झालेल्या मानेला गुंडाळाला. थोड्या वेळाने गाईला काहीशा प्रमाणात शुद्ध आली आणि त्या गर्भवती गाईचे अखेर प्राण वाचले. गोमातेचे व तिच्या पोटातील पिल्लूचे प्राण वाचवण्याचे काम नाशिक येथील सिडकोतील साधना ओल्ड एज केअर सेंटरचे डॉ. उल्हास कुटे, शिक्षक अपंग संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, जागृत शिक्षक संघटनेचे शेरेकर सर आणि काही इतर वाटसरू व्यक्तीच्या मदतीने झाल्याने प्राणीप्रेमी मध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

Image may contain: one or more people

वाहनधारकांनी सामाजिक जबाबदारी घेतली पाहिजे
सायंकाळच्या वेळेला मुकी जनावर शेतातून आपल्या मालकाच्या घराकडे महामार्गावरून जात असतात. तर काही महामार्ग ओलांडत असतात. अशावेळी माणुसकीच्या पोटी वाहनधारकांनी सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन आपली वाहन सावकाश चालवणे गरजेचे आहे. तर अशा प्राण्यांचे मालकांनी त्यांच्या सोबत असणे आवश्यक आहे.- डॉ. उल्हास कुटे, साधना ओल्ड एज केअर सेंटर, सिडको, नाशिक

क्लिक करा > VIDEO :...अन् जवानाचे पॅराशूट अडकले बाभळीच्या झाडावर...मग...

गाईचे प्राण वाचले याचा अत्यानंद
लग्न आटोपून नाशिक कडे जात असताना जखमी अवस्थेतील गर्भवती गाय दिसून आली. गाडी रस्त्याच्या कडेला लावत, गाडीतील पाण्याची बॉटल काढून गाईला पाजले. रस्त्याच्या कडेला सरकवत प्रथम उपचार केले. काही क्षणात शुद्ध आली. व गाईचे प्राण वाचले याचा अत्यानंद होत आहे.- बाळासाहेब सोनवणे, अध्यक्ष, अपंग शिक्षक संघटना

 

हेही वाचा > लग्न जमण्याच्या आधीच 'दोघांना' भेटणं पडलं चांगलच महागात...! 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: humanity saves Pregnant cow Nashik Marathi News