क्रूरपणाचा कळस! गरोदर पत्नीच्या मृत्यूची सांगितली खोटी कहाणी; सासऱ्याची फिर्याद, जावई गजाआड

pregnent 123.jpg
pregnent 123.jpg

इंदिरानगर (नाशिक) : शनिवारी (ता. २४) चोरट्यांनी पत्नीचा खून करून घरातील रोकड आणि दागिने लूटल्याची कहाणी जावयाने सांगितली होती. मात्र, त्यानेच खून केला असल्याचा संशय असल्याची फिर्याद त्याचे सासरे तानाजी कचरे यांनी शनिवारी रात्री पोलिसांत दिली. या फिर्यादीवरून रात्री उशिरा पोलिसांनी त्यास अटक केली. नेमके काय घडले वाचा...

क्रूरपणाचा कळस! गरोदर पत्नीच्या मृत्यूची सांगितली खोटी कहाणी

म्हाडा घरकुल प्रकल्पाच्या ‘सी’ विंगमधील दहाव्या मजल्यावरील १००२ क्रमांकाच्या सदनिकेत भरत जाधव हा वर्षापासून भाडेतत्त्वावर पत्नीसोबत वास्तवास आहे. भरत सकाळी सातपूर येथील एलजी कंपनीच्या शोरूम या त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कामाला गेला. दुपारी जेवणाच्या सुटीत पत्नीला मोबाईलवर संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला; मात्र काही प्रतिसाद लाभला नाही. त्यात पत्नी प्रमिला गरोदर असल्याने चिंता वाढल्याने तो अर्ध्या तासात घरी पोचला असता, दरवाजाला बाहेरून कडी लावलेली आढळली. कडी उघडली असता समोर एका ब्लॅंकेटमध्ये तोंड आणि पाय बांधलेल्या आणि पूर्ण शरीराला वायरने बांधून ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेली प्रमिला मृतावस्थेत आढळली.

त्यामुळे सगळेच संशयास्पद वाटत होते.

चोरट्यांनी तिला ठार मारत तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, मोबाईल व घरात ठेवलेले दहा ते पंधरा हजारांची रोकड, असा ऐवज घेऊन दरवाजाला कडी लावून पोबारा केल्याचा बनाव करत सर्वांना कळविले. त्यात डॉक्टरांनी देखील प्रमिलाचा मृत्यूचा सांगितलेला कालावधी आणि भरत सांगत असलेल्या घटनाक्रमातील कालावधीशी सुसंगत होत नव्हता. तसेच चोरट्यांनी घरातील इतर साहित्याला हात न लावल्याचे दिसून आले. त्यामुळे सगळेच संशयास्पद वाटत होते. प्रमिलाकडे असलेल्या ऐवजची किंमत एवढी नसून तुटपुंजा पगार बघता रोख रक्कम घरात असणे अशक्य आहे. त्यामुळे काहीतरी कारणावरून पतीनेच खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता, त्यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर तपास करीत आहेत.  

त्याने खुनाची कबुली दिली नाही

पाथर्डी फाटा येथील म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या प्रमिला जाधव (वय २६) या गर्भवती महिलेच्या खून प्रकरणी तिचा पती भरत जाधव (रा. कोकनवाडी, ता. अकोले, जि. नगर) यास पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली आहे. 
पोलिस चौकशीत त्याने दिलेल्या माहितीत तफावत असल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. मात्र, त्याने खुनाची कबुली दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com