esakal | संतापजनक! पहिल्या पत्नीचा मानसिक छळ; पतीने गुपचूप दुसरा विवाह केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

woman cying.jpg

माहेरून पैसे आणावेत, वांझोटी, करंटी आहे, असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ करीत पतीने दुसरा विवाह केल्याची तक्रार धुळे तालुक्यातील सासर असलेल्या महिलेने छावणी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 

संतापजनक! पहिल्या पत्नीचा मानसिक छळ; पतीने गुपचूप दुसरा विवाह केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक / मालेगाव : माहेरून पैसे आणावेत, वांझोटी, करंटी आहे, असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ करीत पतीने दुसरा विवाह केल्याची तक्रार धुळे तालुक्यातील सासर असलेल्या महिलेने छावणी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 

असा घडला प्रकार
शहरातील कलेक्टरपट्टा भागातील माहेरवाशीण वंदना ठाकूर (वय ३६, रा. इंद्रकूटनगर) ही विवाहिता वांझोटी आहे. मूलबाळ होत नाही. आमच्या वंशाला दिवा देणार नाही. माहेरून गाडी घेण्यासाठी दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून पती मंगलसिंग ठाकूर (रा. कुलथे, ता.जि. धुळे) व सासूसह चौघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. यात पती मंगलसिंगने पत्नी हयात असताना टोकडे येथील कैलास ठाकूर व पाराबाई ठाकूर यांची कन्या कविता हिच्याशी गुपचूप विवाह केल्याची व मारहाण करीत वारंवार ठार करण्याची धमकी देत असल्याचे श्रीमती ठाकूर यांनी तक्रारीत म्हटले आहे. हा छळ १५ वर्षांपासून सासरकडील मंडळींकडून सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. छावणी पोलिसांनी चौघांविरुद्ध विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल केला आहे.  

हेही वाचा > धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप\

go to top