जिल्ह्यातील १३ शाळांच्या प्रवेशद्वारावर लागणार ‘आदर्श'चा बोर्ड! शिक्षण विभागाकडून निवड

zp school.jpg
zp school.jpg

येवला (नाशिक) : नवनिर्मितीला चालना देणारे कौशल्य,समीक्षात्मक विचार,वैज्ञानिक प्रवृत्ती,संविधानिक मूल्य संभाषण कौशल्याची रुजवणूक आणि सोबतच कृतीयुक्त शिक्षणातून स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती या गुणवत्तानी विकसित झालेल्या आणि परिपूर्ण भौतिक सुविधा असलेल्या ३०० जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा राज्यात बनविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १३ जिल्हा परिषद शाळांना आदर्श होण्याची संधी या उपक्रमामुळे चालून आली आहे.

शिक्षण विभागाकडून निवड, गुणवत्तेसह चेहरामोहरा बदलण्याचा निश्‍चय
या शाळा निश्चित निकषानुसार किमान प्रत्येक तालुक्यातील एक शाळानुसार पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या शाळा निवडण्यात आल्या आहेत.शैक्षणिक गुणवत्तेसाठी नवनिर्मितीला चालना देणारे, वैज्ञानिक वृत्ती,संवैधानिक मूल्ये,संभाषण कौशल्ये, या सारखी कौशल्ये या शाळांत विकसित करण्यात येणार आहेत. या शाळांचा विविध स्तरावर विकास केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना ताण विरहित उत्तम शिक्षणाचे वातावरण मिळावे आणि पाठ्यपुस्तके, दप्तरातील साहित्याच्या पलीकडे जाऊन शाळेच्या परिसरात उपलब्ध साधन सामग्रीतून ज्ञान अवगत करता यावे हा या उपक्रमाचा उद्देश असणार आहे. 

विविध कौशल्ये शाळांत विकसित करण्यात येणार
या शाळांची निर्मिती करताना भौतिक सुविधांमध्ये स्वतंत्र शौचालये, आयसीटी लॅब, ग्रंथालय, सायन्स लॅब, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य यांसारख्या भौतिक सुविधा आवश्यक असणार आहेत. शैक्षणिक गुणवत्तेसाठी नवनिर्मितीला चालना देणारे, वैज्ञानिक वृत्ती,संवैधानिक मूल्ये,संभाषण कौशल्ये, या सारखी कौशल्ये या शाळांत विकसित करण्यात येणार आहेत. या आदर्श शाळांमध्ये पुस्तकांच्या पलीकडे जाऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा, गणित विषयातील मूलभूत संकल्पना, त्यात वाचन लेखन, गणिती प्रक्रिया येणे अनिवार्य असणार आहे. शाळेच्या ग्रंथालयांमध्ये पूरक वाचनासहित,गोष्टींची पुस्तके,संदर्भ ग्रंथ,इनसायक्लोपीडिया उपलब्ध असणार आहेत. तसेच स्वयं अध्ययनासोबत गट अध्ययन यासारखे रचनात्मक पद्धतीचे शैक्षणिक कार्यक्रमही राबविण्यात येणार आहेत.भविष्यात आदर्श शाळेकडून पाहून इतर शाळा सोडून आपल्या पाल्याला या शाळेत प्रवेश देण्यासाठी तयार होतील त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व कसे घडवता येईल व सर्वांगीण गुणवत्ता विचारत घेऊन नवनवीन उपक्रम या शाळांमध्ये सुरू करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. 

शिक्षकांना पाच वर्षांचा कालावधी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केल्याप्रमाणे शाळांतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना येथील सुविधांचा लाभ घेता येणार आहे.येथे मुलांचा शारीरिक, बौद्धिक,मानसिक विकास शिक्षणातून करणे हे या शाळेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. शिक्षकांची काम करण्याची इच्छा असेल, बदलीने येण्याची तयारी असेल, किमान वर्षे तेथे काम करण्याची तयारी असेल अशी शाळा ही आदर्श शाळा असणार आहे. यादीमधील शाळांची निकषांद्वारे पडताळणी करून काही बदल असल्यास ६ नोव्हेंबरपर्यंत शिक्षण विभागाला कळवायचे आहे. 

जिल्ह्यातील या शाळांची झाली निवड...
आसखेडा,ता. बागलाण
शिंदे,ता. चांदवड
महालपाटणे,ता. देवळा
अहिवंतवाडी,ता. दिंडोरी
अडसरे बुद्रुक,ता. इगतपुरी
उंबरगाव,ता. कळवण
मेहुणे,ता.मालेगाव
वंजारतांडा-न्यायडोंगरी,ता.नांदगाव
पालखेड,ता.निफाड
मालेगाव,ता. पेठ
दापुर,ता. सिन्नर
अंबाठा,ता.सुरगाणा
अंदरसुल गर्ल्स,ता.येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com