फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनमधून काढल्यास याद राखा; शाळांपुढे तीव्र आंदोलनाचा इशारा

online education.jpg
online education.jpg

नाशिक रोड : शाळेची फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासमधून काढण्याच्या शिक्षण संस्थांच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शाळांपुढे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेने शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची भेट घेऊन संबंधित शाळांवर कारवाईची मागणी केली आहे. 

शाळांपुढे तीव्र आंदोलनाचा इशारा
पैशांअभावी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, असा सरकारचा आदेश असतानाही काही मुजोर शाळा विद्यार्थ्यांच्या शुल्कासाठी तगादा लावत आहेत. खासगी शिक्षण संस्था इतर वेळी भरमसाट फी घेतातच पण कोरोना काळातही पालकांकडे तगादा लावत आहेत. शाळा बंद असल्याने ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. शाळा बंद असली तरी शिक्षकांचा पगार सोडून इतर कोणताही खर्च नसताना शाळा ऑनलाइन क्लासच्या नावाखाली प्रत्येक संपूर्ण फीसाठी पालकांवर दबाव आणला जात आहेत. फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेसमधून काढून टाकण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी फी भरावी, असा धमकीवजा इशारा शाळांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे अशा धमकी देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 


मनसे विद्यार्थी सेनेचे नाशिक रोड अध्यक्ष नितीन धानापुणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत चौधरी, उमेश भोई, भाऊसाहेब ठाकरे, रंजन पगारे, गुड्डू शेख, स्वप्नील विभांडिक, जोगित पिल्ले आदींनी निवेदन दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com