''...नाहीतर तत्काळ राजीनामा द्या''; अभाविपची उदय सामंत यांच्याकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

सूडबुद्धीने राजकीय दबावतंत्राचा वापर महाराष्ट्रात सतत सुरू आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. विद्यार्थी हिताचे निर्णय घेऊ शकत नसाल तर तात्काळ राजीनामा द्या अशी मागणी देखील करण्यात आली.

नाशिक : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 20) नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उपकेंद्र नाशिक यांच्या परिक्षांबाबत आढावा बैठका होत आहे. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

शिक्षणमंत्री उदय सामंत यांना भेटण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी अटक होते आहे. नाशिकमधील कार्यकर्त्यांना आज रविवारी (ता. 20) अटक करण्यात आली. सूडबुद्धीने राजकीय दबावतंत्राचा वापर महाराष्ट्रात सतत सुरू आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. विद्यार्थी हिताचे निर्णय घेऊ शकत नसाल तर तात्काळ राजीनामा द्या अशी मागणी देखील करण्यात आली. यावेळी अभाविप प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you can't make decisions in the interest of the students, resign immediately - demand of Abhavip activists nashik marathi news