आस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल! इगतपुरीत मुसळधारेने भातपिके आडवी; शेतीचे मोठे नुकसान

गोपाळ शिंदे
Thursday, 15 October 2020

भातपिकांसाठी लावलेले भागभांडवलासह मजुरी व खत-बियाणे यांचा खर्च निघणार नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. तालुक्याच्या पूर्व व मध्य भागात पावसाने थैमान घातल्याने नदी-नाले दुथडी वाहत आहे. मात्र शेतात प्रचंड प्रमाणात पाणी साचले आहे.

नाशिक : (घोटी) इगतपुरीच्या पूर्व व मध्य भागात बुधवारी (ता. 14) मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काढणीला आलेल्या भातपिकांचे नुकसान झाले आहे. तुडतुड्या व पंधरा टाका रोगाने आधीच मेटाकुटीला आलेले शेतकरी आता वादळी पावसाने हवालदिल झाले आहेत. जागोजागी शेताशेतांतून भातपिके पडल्याचे चित्र दिसत आहे. 

शेतकरी चिंतातूर...

हंगामातील वर्षात यंदा तालुक्यात २८ हजार सातशे हेक्टरवर भात लागवड करण्यात आली. यातून सरासरी उत्पन्न दोन लाख ८०० क्विंटल भात उत्पादन निघणार होते. मात्र विविध रोगांनी व आस्मानी संकटाने उत्पादनात घट होणार आहे. भातपिकांसाठी लावलेले भागभांडवलासह मजुरी व खत-बियाणे यांचा खर्च निघणार नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. तालुक्याच्या पूर्व व मध्य भागात पावसाने थैमान घातल्याने नदी-नाले दुथडी वाहत आहे. मात्र शेतात प्रचंड प्रमाणात पाणी साचले आहे. जनावरांचा हिरवा चारादेखील कुजण्याच्या मार्गावर आहे. भातपिकांचे पंचनामे तातडीने करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर यांच्यासह विविध शेतकरी संघटनांनी मागणी करत गावोगावी भेटी देत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.  

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Igatpuri, paddy crop is affected due to rains nashik marathi news