प्रशासनाच्या मोहिमेत रात्री मोठे 'घबाड' मिळविण्यात यश; दोन जणांना ठोकल्या बेड्या

seized liquor.jpg
seized liquor.jpg

नाशिक : नगर-मनमाड मार्गावर भरधाव दहाचाकी ट्रक अडवून तपासणी केली. त्यावेळी जिल्ह्यात प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेत गुरुवारी (ता.३) रात्री आणखी मोठे घबाड मिळविण्यात प्रशासनाला यश आले.

मोठे घबाड मिळविण्यात प्रशासनाला यश

नगर-मनमाड मार्गावरून बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता.४) रात्री पिंपळगाव जलाल शिवारातील येवला टोल नाका भागात वाहन तपासणी सापळा लावण्यात आला. जिल्ह्यातील बेकायदा मद्य वाहतुकीविरोधात प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेत गुरुवारी (ता.३) रात्री आणखी मोठे घबाड मिळविण्यात प्रशासनाला यश आले. नगर-मनमाड मार्गावरील पिंपळगाव जलाल शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दहाचाकी वाहनांतून तब्बल ९४ लाखांचा मद्यसाठा जप्त केला. 

दहाचाकी ट्रकमधून वाहतूक 
भरधाव दहाचाकी ट्रक (एमएच ०४ डीएस २९२८) अडवून तपासणी केली असता हा मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. ट्रकच्या चालक व क्लिनरला ताब्यात घेतल्यानंतर पथकाने गाडीतील ब्ल्यू क्रेशर, ब्लॅक पॅशन, रॉयल रायडर व्हाइट मॅजिक, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, इंपेरिअल ब्ल्यू, रॉयल रायडर रेअर ओक, रॉयल डबल, इंपेरिअल वॅट नं. १ आदी प्रकारच्या विदेशी मद्याने भरलेली खोकी अशा वाहनासह मद्यसाठा असा सुमारे ९३ लाख ६३ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयितांच्या अटकेने बेकायदा मद्यवाहतुकीचा भांडाफोड होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

दोन जणांना बेड्या

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार बेकायदा वाहतूक होणाऱ्या वाहनांसह दारूसाठा जप्त करीत, या कारवाईत शहादा (जि. नंदुरबार) येथील दोन जणांना बेड्या ठोकल्या. संजय पाटील (३६) व काशीनाथ पाटील (४३, रा. सालदारनगर, जुना प्रकाशा रोड, शहादा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

उत्पादन शुल्क विभागाची पिंपळगाव जलाल शिवारात कारवाई 

पथकाचे निरीक्षक ऋषीकेश फुलझळके, दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते, निरीक्षक डी. एन. पोटे, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली. येवला, मालेगाव, सटाणा, कोपरगाव व नाशिकच्या भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. विभागीय पथकाचे निरीक्षक आर. एम. फुलझळके अधिक तपास करीत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com